Home महाराष्ट्र महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी संघाच्या जिल्हाध्यक्षपदी संत जनाबाई कॉलेजचे भारत हत्तीअंबीरे यांची निवड

महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी संघाच्या जिल्हाध्यक्षपदी संत जनाबाई कॉलेजचे भारत हत्तीअंबीरे यांची निवड

111

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.4फेब्रुवारी):-शहरातील श्री संत जनाबाई शिक्षण संस्थेच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथील कार्यालयीन अधीक्षक भारत हत्तीअंबिरे यांची अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी संघाच्या परभणी जिल्हाध्यक्षपदी निवड झाली.

महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी महासंघ कल्याण संलग्नित स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कार्यक्षेत्रातील अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेत्तर संघाचे विभागीय सरचिटणीस गोविंद जोशी यांनी संत जनाबाई महाविद्यालयातील कार्यालयीन अधीक्षक भारत हत्तीअंबीरे यांच्या कार्याची दखल घेत परभणी जिल्हाध्यक्ष पदी निवड केल्याचे पत्र १ फेब्रुवारी रोजी काढले. भारत हत्तीअंबीरे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here