Home महाराष्ट्र रहदारीच्या रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याकरिता आमरण उपोषण सुरू

रहदारीच्या रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याकरिता आमरण उपोषण सुरू

206

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि. 4 फेब्रुवारी):-मुळावा ग्रामपंचायत अंतर्गत वार्ड क्रमांक 2 शांतीनगर येथे रहदारीच्या रस्त्यावर शेजाराने अतिक्रमण करून रस्ता बंद केला सदरील रस्ता खुल्ला करून देण्यात यावा.

याकरिता येथील नागरिक शेख गणी शेख मिया हे दि. 3 फेब्रुवारी 2023 पासून ग्रामपंचायत मुळावा कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत.मुळावा ग्रामपंचायत हद्दीमध्ये दिवसेंदिवस सार्वजनिक ठिकाणी अतिक्रमण वाढत असून वाढत्या अतिक्रमणावर मुळावा ग्रामपंचायतीने ठोस पाऊल उचलल्या दिसत नाही.

त्यामुळे नागरिकांना नाईलाज असतो उपोषणाचा मार्ग अवलंबवा लागत आहे त्याचा एक भाग म्हणून वार्ड क्रमांक 2 शांतीनगर येथील नागरीक शेख गणी शेख मिया यांच्या घराकडे जाण्याच्या सार्वजनिक रस्त्यावर शेजाऱ्याने अतिक्रमण केल्याचे दिनांक 1 ऑगस्ट 2022 रोजी अतिक्रमण हटवून रस्ता खुला करून देण्यात यावा.

करिता लेखी विनंती अर्ज दिला परंतु मुळावा ग्रामपंचायत ने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही मी त्रस्त झालो माझे लहान मुलं, पत्नी व मि नालीच्या काठावरून ये जा करीत आहोत तेव्हा आम्हाला ये जा करताना दुखापत होऊ शकते.

याविषयी तीन वेळा लेखी अर्ज व अनेक वेळा तोंडी विनंती करूनही मुळाला ग्रामपंचायतीने लक्ष दिले नसल्यामुळे मी दिनांक 3 फेब्रुवारी 2023 रोजी आमरण उपोषणाला बसत असल्याची लेखी निवेदन मुळावा ग्रामपंचायत व संबधितांना देऊन शेख गणी शेख मीया हे मुळावा ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here