Home महाराष्ट्र बोधिसत्व बुद्धविहार येथे समता सैनिक दल प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न

बोधिसत्व बुद्धविहार येथे समता सैनिक दल प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न

166

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.4फेब्रुवारी):- दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष भिमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या आदेशानुसार व जिल्हाध्यक्ष रवि भगत यांच्या नेतृत्वात संरक्षण विभाग यवतमाळ वतीने सुभेदार रामजी बाबा स्मृती दिनानिमित्ताने दि. 1 फेब्रुवारी ते दि 2 फेब्रुवारीला 100सैनिकाचे समता सैनिक दल प्रशिक्षण शिबिराचे आयोजन बोधिसत्व बुध्दविहारात करण्यात आले होते.

सर्वप्रथम तथागत भगवान बुध्द व डॉ. बाबासाहेब आंबेडकर व रामजी बाबा या महामानवांच्या प्रतिमांचे पुजन पुष्पहाराने मेणबत्ती व अगरबत्ती प्रज्वलित करुन करण्यात आले. आणि सामुहिक त्रिसरण पंचशील वंदना घेतली.कार्यक्रमाचे अध्यक्ष,रवि भगत, धर्मपाल माने, भगवान इंगळे, रुपेश वानखडे, प्रशिक्षक मेजर विलास हिवराळे मेजर प्रमोद खडे,राहुल राऊत, कोषाध्यक्ष, ज्ञानेश्वर अभ्यंकर, रंजनाताई ताकसांडे,मोहन भवरे, दारव्हा तालुकाध्यक्ष सिध्दार्थ गायकवाड, गोपाल लोणारे, गौतम कुंभारे उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोहन भवरे,यांनी केले.

कळंब,बाभूळगाव,दारव्हा,दिग्रस,पुसद,महागाव,उमरखेड,यवतमाळ,घाटंजी,पांढरकवडा इत्यादी तालुक्यातील सैनिकांनी या शिबित सहभाग घेतला होता. अशोक निमसरकर, गौतम वाकोडे, माजी सैनिक उत्तम मोरे, कवडू नगराळे ,गोपीचंद कांबळे ,रोमांत पाटील, भारत कांबळे,भोलानाथ कांबळे, राहुल पडघणे,संघर्ष ओंकार , नागोराव बनसोड,धम्मदीप पाईकराव, साहेबराव इंगोले, किरणताई बागडे यांनी मनोगत व्यक्त केले.प्रशिक्षणार्थी सैनिक कवडु नगराळे हे मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, समता सैनिक दलाच्या प्रशिक्षणातुन प्रचंड उर्जा मिळाली असुन भविष्यात शेकडो सैनिक तयार करण्याची प्रेरणा मिळाली आहे. गोपीचंद कांबळे यांनी उतरत्या वयात सैनिक बनुन कार्य करण्याची दिशा मिळाल्याचा आनंद व्यक्त केला.प्रमुख मार्गदर्शक विजय हिवराळे यांनी सामुहिक प्रतिज्ञा म्हणून घेतली उपाध्यक्ष रंजनाताई ताकसांडे व कोषाध्यक्ष राहुल राऊत यांनी शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष रवि भगत यांनी सविस्तर मार्गदर्शन केले विशेष म्हणजे या वेळी दिवंगत देविदास पाटील माजी उपाध्यक्ष जिल्हा शाखा यवतमाळ यांचे स्मरणार्थ सुशिलाताई पाटील यवतमाळ यांनी समता सैनिक दलाच्या पथ संचलनासाठी 6हजार500 रुपयांचा बॅंड संच भेट दिला.समारोपीय कार्यक्रमाला आर्णि तालुकाध्यक्ष नागोराव बनसोड, पुसद तालुकाध्यक्ष भारत कांबळे,उमरखेड तालुकाध्यक्ष धम्मदीप काळबांडे इत्यादी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गौतम कुंभारे यांनी केले तर आभार सिद्धार्थ बनसोड उपाध्यक्ष तालुका शाखा यवतमाळ यानी केले.

या कार्यक्रमास तालुका व जिल्हा शाखेचे पदाधिकारी, धम्मबांधव, धम्मभगिनी केंद्रीय शिक्षिका, केंद्रिय शिक्षक, बौध्दाचार्य उपस्थित होते.समता सैनिक दलाचा ध्वज अवतरण करण्यात येऊन कार्यक्रमाची सांगता सरणतय गाथेने करण्यात आली.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी किशोर उके, नामदेव इंगोले याचे विशेष परिश्रम घेतले आणि तमाम देणगी दात्यांनी देणगी देऊन सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here