Home क्राईम खबर  खटाव तालुक्यातील 71 जन हद्दपार-वडूज पोलीस ठाण्याची कारवाई

खटाव तालुक्यातील 71 जन हद्दपार-वडूज पोलीस ठाण्याची कारवाई

140

सातारा खटाव (प्रतिनिधी)
नितीन राजे 9822800812
वडूज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ७१ जणांना निवडणूक काळात खटाव तालुक्यातून हद्दपार करण्यात आले आहे.

पोलीस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आँचल दलाल, पोलीस उपअधीक्षक अश्विनी शेंडगे यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय गुन्हे दाखल, तसेच सार्वजनिक शांततेस बाधा निर्माण होऊ नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरिता अशा गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करण्याचे आदेश पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांना दिले होते.

त्याप्रमाणे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील ७१ गुन्हेगार यांच्याकडून दखलपात्र, अदखलपात्र स्वरूपाचे गंभीर अपराध होण्याची शक्यता असल्याने त्यांच्याकडून
सार्वजनिक शांततेत बाधा निर्माण होऊ नये, तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी त्यांना शुक्रवारपासून (दि. ३) ते मंगळवारपर्यंत (दि. ७) या कालावधीमध्ये कार्यक्षेत्रात प्रवेश करण्यास मनाई करण्याबाबतचा आदेशाचा उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविला होता. त्यानुसार संबंधितांना तालुक्यातून हद्दपार करण्यात आले आहे. मात्र, संबंधितांना मंगळवारी (दि. ७) सकाळी अकरा ते बारा या वेळेत मतदान करण्याची मुभा देण्यात आली आहे.

पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माहुली (मायणी), तरसवाडी घाट याठिकाणी दोन आंतरजिल्हा तपासणी नाके व कराड नाका, विखळे फाटा, मायणी येथे तीन स्थिर सर्वेक्षण पथके तैनात करण्यात आली आहेत. पोलीस ठाण्यात सोशल मीडिया मॉनिटरिंग कक्षाचीही स्थापना करण्यात आली आहे. याशिवाय परवाना धारक ६६ शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here