Home महाराष्ट्र पीक विमासाठी तांडा सुधार समितीने घेतली तहसीलदारांची प्रत्यक्ष भेट

पीक विमासाठी तांडा सुधार समितीने घेतली तहसीलदारांची प्रत्यक्ष भेट

138

🔸5 फेब्रुवारीपर्यंत बँकेत जमा होणार कृषी अधिकाऱ्यांचे यांचेआश्वासन

✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)
__________________________
पुसद(दि.29जानेवारी):-तालुक्यातील 30 ते 40 टक्के शेतकऱ्यांना अद्याप पीकविमा मिळालेला नसून ज्या 10 ते 20 टक्के शेतकऱ्यांना पीकविमा मिळाला तो अत्यल्प दिला गेला आहे. त्यामुळे आज तांडा सुधार समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय आडे यांच्या नेतृत्वात अनेक शेतकऱ्यांनी मा.तहसीलदार साहेब पुसद यांची भेट घेतली.

कर्त्यव्यदक्ष तहसीलदार साहेब यांनी तात्काळ लगेच कृषिधिकारी बेरड साहेब यांना भ्रमध्वनी वरून संपर्क साधला आणीआपण उपोषण मंडपास कार्यकर्त्यास भेट दिली होती त्याचे काय झाले अशी विचारपुस केली. तर जिल्हा कृषी पीकविमा कार्यालयाला फोन करून विचारणा केली असता सर्व शेतकऱ्यांचे पीकविमा 5 फेब्रुवारी पर्यंत जमा होईल असे आश्वासन दिले. तहीलदार साहेबांचे तांडा सुधार समितीच्या वतीने आभार मानण्यात आले. याप्रसंगी संजय मदन आडे,जिनकर राठोड, पवन राठोड,संतोष चव्हाण, सुनिल चव्हाण,भाऊराव चव्हाण, किरण चव्हाण, गुलाब मस्के, संतोष जाधव, प्रकाश जाधव, सुनिल मांजरजवळा इत्यादी तरुण शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here