Home महाराष्ट्र मानवतावादी साहित्य बौद्ध धर्माची देन : जयसिंग वाघ

मानवतावादी साहित्य बौद्ध धर्माची देन : जयसिंग वाघ

39

अमळनेर :- गौतम बुद्ध यांनी जी विचारधारा मांडली तीचा प्रचार आणि प्रसार करण्या करीता साहित्य निर्मिती करण्यात आली , हे साहित्य बौद्ध साहित्य म्हणून ओळखले जाते . बौद्ध साहित्यात कर्मकांड , ढोंग , मंत्र , तंत्र नसल्याने तसेच हे साहित्य मानवी कल्याणाची भाषा करीत असल्याने ते मानवतावादी ठरते असे स्पष्ट प्रतिपादन प्रसिद्ध साहित्तीक जयसिंग वाघ यांनी केले .
प्रताप महाविद्यालय , अमळनेर तर्फे प्रसिद्ध साहित्तीक व विचारवंत प्रा. डॉ. म. सु. पगारे लिखित ‘बा , तथागता ‘ या पुस्तका वर आयोजित चर्चेत जयसिंग वाघ बोलत होते . ११ एप्रिल रोजी आयोजित या कार्यक्रमात प्रा. डॉ. रमेश माने
संपादित ‘ बा , तथागता मानवतावादी
सौंदर्यशास्त्र ‘ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले .
जयसिंग वाघ यांनी आपल्या भाषणात सांगितले की , बा , तथागता हा काव्यग्रंथ सर्वसामान्य व्यक्तिस समजेल अश्या सोप्या भाषेत लिहिला आहे , यात गौतम बुद्ध यांचेशी संवाद साधुन बुद्ध यांच्या एकूणच जीवन कार्य तसेच विचारधारा यावर प्रकाश टाकलेला आहे .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी कुलगुरु डॉ. एन. के . ठाकरे होते . त्यांनी आपल्या भाषणात गौतम बुद्ध यांच्या विविध पैलुंवर प्रकाश टाकून बुद्धाच्या विचारांनीच मानवाचे कल्याण होणार आहे असे स्पष्ट केले .
प्रा. डॉ. म. सु. पगारे यांनी बा , तथागता हा काव्यग्रंथ का लिहावासा वाटला व तो लिहिण्या करीता कोणकोणत्या ग्रंथांचा अभ्यास केला , काव्यग्रंथ प्रकाशित झाल्यानंतर त्यास मिळालेला प्रतिसाद विस्तृतपणे सांगितले . या काव्यग्रंथाच्या दोन आवृत्या संपल्या असून याच्या हिंदी , इंग्रजी , आहीराणी भाषेत भाषांतर केले जातआहे . या काव्यग्रंथावर विविध क्षेत्रातील लेखकांनी लेखन केले असून त्याचे स्वतंत्र पुस्तक आज प्रकाशित होत आहे हि बाब अभिमानास्पद आहे असे सांगितले .
या प्रसंगी प्राचार्य डॉ. संजीव गिरासे , प्रा. डॉ. धनराज धनगर यांनी सुद्धा आपले विचार व्यक्त केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. विलास मोरे यांनी तर आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर कांबळे यांनी केले .
सुरवातीस महात्मा फुले , बहिनाबाई चौधरी यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले . कार्यक्रमास डॉ. पी. एस. भावसार , डॉ. धीरज वैष्णव , डॉ. संजीवकुमार सोनवणे , डॉ. रमेश पवार , प्रा. बी. एन. चौधरी आदिंसह प्राध्यापक वर्ग , विद्यार्थी मोठ्यासंख्येने हजर होते .
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता प्रा. योगेश पाटील , डॉ. विलास गावित , प्रा. प्रतिभा पाटील यांनी परिश्रम घेतले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here