Home गंगाखेड नवं मतदार हे उद्याच्या भारताचे भवितव्य – सुरेश इखे

नवं मतदार हे उद्याच्या भारताचे भवितव्य – सुरेश इखे

103

 

 

अनिल साळवे,विशेष प्रतिनिधी मो. 86985 66515

गंगाखेड (प्रतिनिधी )तालुक्यातील राणी सावरगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालय येथे दिनांक 5 डिसेंबर मंगळवार रोजी मतदार जन जागृती व नवं मतदार नोंदणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी भारत हा तरुणांचा देश आहे व नवं मतदार हे उद्याचे भविष्य आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी मतदार यादी मध्ये आपले नाव नोंदवून मतदान केले पाहिजे व देशाच्या लोकशाहीतील निवडणूक प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेतला पाहिजे असे निवडणूक प्रकल्प समन्वयक सुरेश इखे यांनी उपस्थित विद्यार्थांना मार्गदर्शन करते वेळेस बोलत होते. सदरील कार्यक्रम निवडणूक कार्यालय गंगाखेड, पूण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महाविद्यालय, राणिसावरगाव व महात्मा गांधी ग्राम विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विजयकुमार सोन्नर सर होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात निवडणूक साक्षाता मंडळाची स्थापना करून नोडल अधिकारी म्हणून श्री प्रा डॉ विजय कुमार सोन्नर सर यांची तर सदिच्छा दूत म्हणून शुभम मिरगेवाड यांची निवड करण्यात आली.त्याना जिल्हाधिकारी श्री रघुनाथ गावडे साहेब यांच्या स्वाक्षरी चे निवडीचे पत्र देण्यात आले.प्राचार्य प्रा डॉ विजय कुमार सोन्नर यांनी विद्यार्थ्यांना मतदार नोंदणी करण्याचे आवाहन केले. यावेळी प्रमुख उपस्थिती जिल्हा निवडणूक प्रकल्प समन्वयक सुरेश इखे, निवडणूक प्रकल्प सहाय्यक अंकुश कांबळे तसेच कार्यक्रम अधिकारी डॉ.विश्वनाथ रासवे, डॉ. बालाजी शिंदे, डॉ. वसंत सरवदे, डॉ.श्रीहरी चव्हाण, डॉ. अंगद गडमे, डॉ. सिंधुताई खंदारे, डॉ. शंकर घाडगे यांची उपस्थिती होती. ज्या विद्यार्थ्यांना 18 वर्षे पूर्ण झाली आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांची मतदार नोंदणी करून घेण्यात आली.या कार्यक्रमाला विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here