Home नागपूर माफ़सू चे संशोधित तंत्रज्ञान प्रसारासाठी सांघिक प्रयत्नाची गरज कुलगुरू डॉ नितीन...

माफ़सू चे संशोधित तंत्रज्ञान प्रसारासाठी सांघिक प्रयत्नाची गरज कुलगुरू डॉ नितीन पाटील यांचे प्रतिपादन : वर्धापन दिन सोहळा

95

 

नागपुर – विदर्भ, मराठवाड्यात शेतीपूरक दुग्धव्यवसायाला चालना देण्यासाठी प्रयत्न होत आहेत. त्यासोबतच राज्यातही अनेक शेतकऱ्यांच्या समृद्धीचा दुग्धव्यवसाय हा सक्षम पर्याय ठरला आहे. त्या पार्श्वभूमीवर सुदृढ व अधिक दूध देणाऱ्या जनावरांसाठीचे पूरक तंत्रज्ञान पशुपालकांपर्यंत पोचविण्याकरिता सांघिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे कुलगुरू डॉ नितीन पाटील यांनी आयोजीत कार्यक्रमात प्रतिपादन केले. माफसू कडून पोल्ट्री, डेअरी व मत्स्य क्षेत्रातील सर्वच घटकांकरिता विविध प्रकारचे तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यात आले आहे. सध्या आयव्हीएफ तंत्रज्ञान अत्यंत फायदेशीर असल्याचे समोर आले आहे. त्या पार्श्वभूमीवर या तंत्रज्ञानाचा व्यापक प्रसार होण्याकरिता सर्वांनी सांघिक प्रयत्न करावे. माफसू अंतर्गत असलेल्या कृषी विज्ञान केंद्राचे योगदान यामध्ये महत्वाचे ठरणार आहे. आयव्हीएफ सोबतच इतर सर्व प्रकारच्या विकसित तंत्रज्ञानाचा प्रसार होण्यासाठी देखील पुढाकार घ्यावा, असेही आवाहन डॉ पाटील यांनी केले.

याप्रसंगी शेतकरी, पशुपालक विद्यार्थी व सामान्य जनतेच्या हितार्थ माफसु संग्रहालय (म्युझियम) विद्यापीठ स्थापना दिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील यांचे शुभहस्ते दि. ३ डिसेंबर २०२३ रोजी विद्यापीठाच्या ग्रंथालय परिसरात खुले करण्यात आले आहे. तसेच नागपूर पशुवैद्यक महाविद्यालयाच्या मैदानावर नव्याने तयार केलेल्या टर्फ क्रिकेट पीचचे उदघाटन करुन विद्यापीठाचे अधिकारी व विद्यार्थ्यांमध्ये प्रदर्शिनी क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. या सामन्यात चुरशीच्या लढतीत अधिकारी संघ विजयी ठरला. नेहमीप्रमाणे वर्धापन दिनाचे औचित्य साधून गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला व सन २०२३ वर्षातील पुरस्कार वितरण सुद्धा करण्यात आले. यामध्ये डॉ. गोविंद गंगणे यांना उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार, डॉ. अतुल ढोक यांना उत्कृष्ठ संशोधक पुरस्कार व श्री नितीन शिंदे यांना उत्कृष्ठ कर्मचारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, सोबतच डॉ. महेश गुप्ता, डॉ. जयंत कोरडे, डॉ. कृष्णा बहिराम, डॉ. विकास सरदार, डॉ. भूषण मेश्राम, डॉ. बच्चांती यांना उत्कृष्ट संशोधनपर लेखासाठी गौरवण्यात आले. विद्यापीठांतर्गत राज्यातील इतर घटक महाविद्यालयामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या विविध कार्यक्रमाचे आयोजन करून विद्यापीठ वर्धापन दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

याप्रसंगी संचालक शिक्षण व पशुविज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ. शिरीष उपाध्ये, कुलसचिव व संचालक संशोधन डॉ. नितीन कुरकुरे, संचालक विस्तार शिक्षण डॉ अनिल भिकाने, अधिष्ठाता (मत्स्यविज्ञान), डॉ. सचिन बोंडे, विद्यापीठ ग्रंथपाल श्री सुनिल गावंडे, परिक्षा नियंत्रक डॉ भुषण रामटेके, पशुवैद्यक महाविद्यालय, नागपूरचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. ए. पी. सोमकुवर, मत्स्य महाविद्यालय नागपूरचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुधीर कविटकर, नियंत्रक (वित्त व लेखा) श्रीमती मनिषा शेंडे, विद्यापीठ अभियंता श्रीमती प्रतिभा वानखेडे, कुलगुरुंचे खाजगी सचिव डॉ वकार खान, उपकुलसचिव डॉ. अजय गावंडे, डॉ. जितेंन्द्र वाघाये, डॉ. अतुल ढोक, डॉ प्रज्ञेय ताकसांडे आणि प्रवीण बागडे यांच्यासह माफसूचे अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन डॉ. महेश जावळे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here