Home चंद्रपूर दक्षिण कोरीयाचे सुनिम(महाथेरो) चोंग दांग यांची नागभीड तालुक्यातील देवटक(देवगीरी) येथील बुद्ध विहाराला...

दक्षिण कोरीयाचे सुनिम(महाथेरो) चोंग दांग यांची नागभीड तालुक्यातील देवटक(देवगीरी) येथील बुद्ध विहाराला भेट

176

 

संजय बागडे ९६८९८६५९५४

नागभीडः दक्षिण कोरिया येथील सुनिम चोंग दांग यांनी नुकतीच नागभीड तालुक्यातील देवटक या गावाला भेट देऊन बुद्ध विहाराची पाहणी केली. दक्षिण कोरिया येथील चोंग दांग यांनी वयाच्या आठव्या वर्षी बौद्ध भिक्कु संघात प्रवेश केला.आज ते दहा पारमीतांचा करुन सुनिम (महाथेरो) या उपादीला पोहचले आहेत. दक्षिण कोरिया व भारत या देशातील बौद्ध स्थळांना भेटी देऊन अभ्यास दौरा सुरु केला आहे. या दरम्यान त्यांनी महाराष्ट्रातील चंद्रपुर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील देवटक (देवगीरी) या गावात त्यांनी आवाज इंडीया टीमच्या माध्यमातून बुद्धकालीन देवगीरी ( आजचा देवटक) या गावाला भेट दिली. यावेळी प्रितम बलकुंडे, राजेश झोडापे, प्रफुल भालेराव, राजेश पाटील, निलकंठ पाटील, नितिन साळवे ही आवाज इंडिया ची टीम नागभीड येथील श्रीकांत खापर्डे यांच्या माध्यमातून आनंद बुद्ध विहार नागभीड येथे थांबली. यावेळी नागभीड येथील बौद्ध उपासक व उपासीका यांनी नागभीड येथील जुना बस स्टाप ते बोद्ध विहारा प्रयंत धम्म रँली काढली. दक्षिण कोरिया येथील मान्यवरांचे यथोचीत स्वागत करण्यात आले. यावेळी कोरियन पद्धतीने महापुजा करुन धम्मदेशना देण्यात साळवे यांनी केला. नितीन साळवे यांचे नागभीड येथील जनता महाविद्यालय येथे झाले. त्यामुळे ते नागभीड येथे वेळेवर पोहचले. भंते चोंग दांग यांनी उपस्थित उपासक व उपासीका यांच्या उपस्थिती योगदाना बद्दल भर दिला.भंते चोंगा दांग यांनी पुंडरीक सुत्ता बद्दल महत्वाच्या सुचना केल्या. तसेच प्रत्येक बौद्ध बांधवांनी आपआपसात चर्चा करुन ब्रम्हपुरी व नागभीड यासाठी जागतिक दर्जाचे भव्य वास्तु ऊभारु असे आश्वासीत केले. जमीन घेण्यापासुन ते वास्तु उभारण्या प्रयंत दक्षिण कोरिया कडुन मदत करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर भंते चोंग दांग हे देवटक येथे प्रयाण केले.तेथे बुद्धकालीन बौद्ध विहार दाखवीण्यात आले. येथील विहारात सुद्धा कोरियन पद्धतीने पुजा पाठ करण्यात आला.देवटक वासीयांना वंदन करुन व शुभेच्छा देऊन भंते चोंग दांग हे पुढील प्रवासासाठी निघाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here