Home महाराष्ट्र मुलगी वाचवा असा संदेश देत प्रबोधनात्मक रॅली…

मुलगी वाचवा असा संदेश देत प्रबोधनात्मक रॅली…

89

✒️ सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

यवतमाळ (दि. 19 ऑक्टोंबर) नवरात्री पर्वनिमित्त जयहिंद दुर्गा उत्सव मंडळ व कस्तुरी मंच च्या वतीने मुलगी वाचवा असा संदेश देत प्रबोधनात्मक रैली काढण्यात आली होती.प्रसूतीनंतर मुलगी जन्माला आल्यास फी न घेता, स्त्री जन्माचे जल्लोषात स्वागत करणारे, बेटी बचाव आंदोलनाचे प्रमुख डॉ गणेश राख ह्यांच्या उपस्थितीत देवीचे पूजन करून रैलीला सुरवात झाली.

यवतमाळ शहरातील समस्या संघटनेच्या वतीने देशात चालू असलेल्या मुलींच्या भ्रूणहत्येची जनजागृती व बेटी बचाओ जनआंदोलन करण्याच्या उद्देशाने ही रॅली जयहिंद चौक इथून जय हिंद दुर्गा उत्सव मंडळाच्या प्रांगणातून सुरू करण्यात आली.तसेच नवीन दुर्गा उत्सव मंडळ चांदणी चौक येथे समारोप करण्यात आला कार्यक्रमांमध्ये प्रमुख उपस्थिती डॉ. गणेश राख प्रणेते (बेटी बचाव जन आंदोलन) डॉ.प्रमोद लोहार डॉ. (राष्ट्रीय मार्गदर्शक) डॉ. लालासाहेब गायकवाड (संयोजक) डॉ. शिवदीप उंदरे (समन्वयक) डॉ. शंतनू जगदाळे (समन्वयक) सौ .राधिका सानप (समन्वयक) लाभलेले होते.

प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. स्नेहा भुयार( अध्यक्ष आय एम ए असोसिएशन यवतमाळ) मा. सौ माधुरीताई आराठे (माजी नगरसेविका) लाभलेले होते.या रॅलीचे व कार्यक्रमाचे आयोजन जय हिंद दुर्गा देवी उत्सव मंडळ यांचे प्रमुख मार्गदर्शक श्री. पवनभाऊ अराठे अध्यक्ष श्री रितेश निलावार कस्तुरी मंचाच्या अध्यक्षा सौ. दीशा निलावार झेप बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष संगीता पवार यांनी केले.

नवीन दुर्गादेवी उत्सव मंडळाचे सोनू सारडे श्रीकांत काकडे जितेंद्र चौधरी मनोज चावरे ओमी चौधरी यांचे कार्यक्रमाच्या समारोपाला सहकार्य लाभले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकल्प अधिकारी सना भगत भाविका मुनेश्वर मीनल नेमाडे रितू गायकवाड कल्पना नागभीडकर प्रशांत घोडे, रवी ठाकूर यांचे प्रयत्न लाभले.कस्तुरी मंचाच्या पदाधिकारी मालती गावंडे, किरण शिरभाते, वर्षा लोखंडे,जयश्री बोबडे,सपना बत्तलवार, विद्याताई मडावी यांचे सुद्धा सहकार्य लाभले. असे वृत्त आमचे ग्राउंड रिपोर्टर अभिजीत गायकवाड यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here