Home चंद्रपूर स्व. दागोजी पिसे महाविद्यालयाला नृत्य स्पर्धेत प्रथम पारितोषीक

स्व. दागोजी पिसे महाविद्यालयाला नृत्य स्पर्धेत प्रथम पारितोषीक

108

 

चिमुर / प्रतिनिधी :-

मेरी माटी मेरा देश अंतर्गत पंचायत समिती चिमुरच्या वतीने घेण्यात आलेल्या तालुका स्तरीय सांस्कृतीक कार्यक्रमात स्व. दागोजी पिसे कनिष्ठ महाविद्यालयाला समुह नृत्य स्पर्धेत प्रथम पारितोषीक प्राप्त झाले.

या चमुमध्ये महाविद्यालयातील साक्षी धानफोले, प्रणाली मडावी, तेजस्विनी उपरकार, रिया बावणे, दुर्गा भोले, काजल कामडी आदी विद्यार्थीर्नीचा सहभाग होता. त्यांनी देश भक्तीपर समुह नृत्य सादर केले होते.

विद्यार्थीनींना प्राचार्या प्रा. पुनम रागीट, प्रा. रागीणी डांगे, प्रा. वनिता टिपले, प्रा. अंशिका लबडे, प्रा. श्रीकांत आवंढे, चेतन भलमे आदीने मार्गदर्शन केले. विद्यार्थीनीनी प्रथम पारितोषीक प्राप्त केल्याबद्दल अध्यक्ष सुरेशराव पिसे यांनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here