Home Education ज्या शाळेने मला घडविले त्या शाळेचे व गावाचे ऋण कधी विसरणार नाही...

ज्या शाळेने मला घडविले त्या शाळेचे व गावाचे ऋण कधी विसरणार नाही – कु स्नेहल गोहाड

73

🔸ग्रामीण भागातून दर्जेदार शिक्षण, विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विशेष भर !

✒️मोर्शी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मोर्शी(दि.17ऑगस्ट):-तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा दापोरी येथे स्वतंत्र दीन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी जिल्हा परिषद शेळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी दापोरी जिल्हा परिषद घडलेली माजी विद्यार्थी कु स्नेहल ज्ञानेश्वर गोहाड या मुलीने आय आय टी गांधीनगर येथे शिक्षण घेऊन कु स्नेहल ची नियुक्ती जपान येथे झाली असून भारताच्या स्वातंत्र्य अमृत महोत्सव वर्षात जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा दापोरी येथे विविध प्रेरणा दायी आणि स्फूर्ती दायी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये शाळेतील मुलांना प्रेरणा मिळावी, मनी जिद्द निर्माण व्हावी या करीता दोन विभूती चा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.

दापोरी जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणारी, गरीब कुटुंबातील मुलगी आज आय आय टी शिक्षण घेणारी मुलगी कु स्नेहल ज्ञानेश्वर गोहाडचा भावपुर्ण सत्कार करण्यात आला. कु स्नेहल गोहाड हीची नियुक्ती जपान येथे झाली असून तिला खुप मोठे पॅकेज मिळत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. आज अनेक पालक मुलाच्या शिक्षणाकरिता मुलांना कॉन्व्हेंट मध्ये पाठवतात पण ह्या जिद्दी मुलीने जिल्हा परिषद शाळेत शिकून यश प्राप्त केले. हे दापोरी येथील जिल्हा परिषद शाळेकरिता अभिमानास्पद गोष्ट आहे असे शाळेचे मुख्याध्यापक गजानन चौधरी म्हणाले.

यावेळी स्नेहल गोहाड हिने मुलांना मार्गदर्शन करतांना सांगितले की आय आय टी किंवा डॉक्टर होण्यासाठी कॉन्व्हेंट मध्येच शिक्षण घ्यावे लागते हे चुकीचे आहे. जिद्द व कष्ट करण्याची तयारी असेल तर यश हमखास मिळते, माझे शिक्षण दापोरी येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. आपणही शिकून मोठे व्हावे. दापोरी जिल्हा परिषद शाळेचे ऋण मी कधीही विसरणार नाही असे सत्काराला उत्तर देताना कु स्नेहल म्हणाली. त्याच बरोबर आज दापोरी च्या एका महान सुपुत्र चा पण गौरव करण्यात आला दापोरी येथील प्रदीप वानखडे हे बी एस फ मध्ये ओरीसा येथे नोकरी करतात त्यांना पण शाळेकडून मोमेंटो देऊन गौरविण्यात आले स्वातंत्र्य च्या शुभ मुहूर्तावर शाळेची प्रगती पाहून श्री रामधन राव ठाकरे आणि श्री ज्ञानेश्वर गोहाड यांनी दहा हजार रुपये देणगी दिली असून शाळेककडून त्यांचे पण आभार मानण्यात आले.

दापोरी येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी शिक्षण व क्रीडा क्षेत्रात आपले विद्यार्थी चमकावेत म्हणून विशेष प्रयत्न सुरु केले असून, विद्यार्थ्यांच्या गुणांना वाव देण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. शाळेत वेगवेगळे शिक्षण, खेळ शिकवले जात असून, खासगी शाळांच्या तोडीसतोड गुणवत्ता या शाळेत निर्माण केली जात आहे. परिणामी, ग्रामीण भागातील शाळा बंद पडण्याच्या मार्गावर असताना, ही शाळा मात्र पालक व विद्यार्थीप्रिय ठरली असून, पंचक्रोशीतील मुले-मुली येथे शिक्षणासाठी येत आहेत. विशेष म्हणजे या शाळेची पटसंख्या २०० पेक्षा जास्त असून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, उत्तम क्रीडा व नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी मुख्याध्यापकांसह शिक्षकवर्ग प्रयत्न करत आहेत — रुपेश वाळके ग्राम पंचायत सदस्य.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here