Home Breaking News पानवण येथील देवाचे दागिने चोरणाऱ्या दोघांवर गुन्हे दाखल

पानवण येथील देवाचे दागिने चोरणाऱ्या दोघांवर गुन्हे दाखल

88

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.8ऑगस्ट):-माण तालुक्यातील म्हसवड जवळील पानवन येथील खंडोबा देवाचे दागिने चोरणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली असून एकाची चौकशी चालू असल्याची माहिती म्हसवड पोलिसांनी दिली.

सविस्तर माहिती अशी की, सौरभ सयाजी तुपे आणि देवदास महादेव तुपे या दोघांनी मिळून जवळपास एक किलो वजनाचे खंडोबाचे चांदीचे दोन मुखवटे चोरल्याची फिर्याद पानवन येथील हिंदूराव चव्हाण यांनी दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

त्यांनी चोरलेल्या एक हजार किलोग्रॅम वजनाच्या चांदीच्या मुखवट्याची किंमत जवळपास २५ हजार रूपये इतकी असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाबाबत चौकशी करून सौरभ तुपे यास अटक करण्यात आली आहे,तर एकाकडे कसून चौकशी सुरू आहे. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्री.डोईफोडे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here