Home महाराष्ट्र बिटरगाव (खु) येथील अवैध दारू बंद करा !

बिटरगाव (खु) येथील अवैध दारू बंद करा !

38

(महिला धडकल्या ‘उमरखेड ‘ ठाण्यावर)

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि. 7 ऑगस्ट):-तालुक्यातील मौजे बिटरगाव (खु) येथील अवैध दारू विक्री बंद करणेबाबत व अवैध धंदे व दारु विक्रेत्यावर कडक कार्यवाही करण्यासाठी दिनांक ७ ऑगस्ट रोजी जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाअध्यक्ष सरोज देशमुख यांच्या नेतृत्वात शेकडो गावकरी महिला उमरखेड पोलिस ठाण्यात धडकुन अवैध दारू विक्रेत्यावर व अवैध धंदे चालविणार्‍यावर पायबंद घालावा अशी मागणी निवेदन देवुन केली आहे.

बिटरगाव (खु) येथे मागील अनेक दिवसापासून अवैध दारू विक्रेता हा राजरोसपणे दारु विकी करीत आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दारु गावातच मिळत असल्याने लहान वयातच मुले दारुच्या आहरी जात आहेत.

दारु पिणारे आणि दारू विक्रेते हे महिलांना जाता येता अश्लिल शिविगाळ करित आहेत. शाळकरी विद्यार्थ्यांना याचा त्रास सहन करावा लागतो आहे.

या प्रकारामुळे अनेक कुटुंब उद्धवस्त होण्याच्या मार्गावर आहेत तर काही कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यामुळे अवैध दारू विक्री व गावातील अवैध धंदे समुळ नष्ट करून कडक कार्यवाही करावी.

अन्यथा जिजाऊ ब्रिगेड कडून तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनातून यवतमाळ जिल्हाध्यक्षा सरोज देशमुख यांनी दिला आहे.

यावेळी बिटरगाव (खु) येथील प्रतिभा नरवाडे, कलावती नरवाडे, संजीवनी लव्हांडे, सिमा चव्हाण, ज्योती लव्हांडे, अर्चना नरवाडे, वनिता लव्हांडे, रुखमीना नरवाडे , प्रणीता नरवाडे, मिना नरवाडे, विमल सुरोशे, लक्ष्मीबाई नरवाडे, मिना चव्हाण, दिपाली लव्हांडे या महिलासह शेकडो महिला उपस्थित होत्या .

चौकट :- दारु विक्रेत्यावर कार्यवाही करावी यासाठी निवेदन देतांना महिलांनी दारू विक्रेत्याचे नावासहीत निवेदन ठाणेदार शंकर पांचाळ यांना दिले आहे त्यामुळे काय कार्यवाही होते ह्याकडे लक्ष लागले आहे.

चौकट – या प्रकरणी बिटरगाव (खु) येथील अवैध दारू विक्रेत्याच्या नावासहीत निवेदन देवून कार्यवाहीची मागणी केली आहे.या संदर्भात ठाणेदार शंकर पांचाळ यांना कार्यवाही करणार का विचारले असता मी बिझी आहे ‘ नंतर बोलूत म्हणून टाळाटाळ चे उत्तर दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here