Home महाराष्ट्र आ. राम कदम आंबेडकरवाद्यांच्या नादी लागू नका, पळता भुई कमी पडेल –...

आ. राम कदम आंबेडकरवाद्यांच्या नादी लागू नका, पळता भुई कमी पडेल – पॅन्थर डॉ. राजन माकणीकर

264

✒️मुंबई(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मुंबई(दि.12डिसेंबर):- घरात घुसून मारू असे चिथावणीखोर वक्तव्य करुन मंत्री चंद्रकांत पाटलांचे समर्थन करणाऱ्या आ. राम कदमांना रिपाई डेमोक्रेटिक च्या राष्ट्रीय महासचिव पॅन्थर डॉ. राजन माकणीकर यांनी औकातीत राहण्याचा सल्ला दिला आहे.

विद्रोही पत्रकार डॉ. माकणीकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावं जी शिंदे यांनी पत्र लिहिले आहे. त्यात ते म्हणाले की, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या बद्दल अपशब्द काढल्यामुळे राज्यातील परिस्तिथी आधीच चिघळली असून भाजपाचे आमदार राम कदम मात्र घरात घुसून मारण्याची भाषा करून राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडवू इच्छितात असल्याचे त्यांच्या बोलण्यातून कळत आहे. त्यांच्यावर आवर घालणे आवश्यक आहे.

राज्यातील जनतेच्या भावनांचा उद्रेक न थांबवता जातीवाद व पक्षवाद वाढविण्याचे काम राम कदम करत आहेत. जातीय तेढ निर्माण करण्याचे कुटील डावपेच आ. राम कदम आखत आहेत. आ. राम कदमांनी आपल्या औकातीत राहून बोलावे नाहीतर भीमसैनिकांच्या नादाला लागून आपले राजकीय अस्तित्व धोक्यात आणू नये. असेही म्हणाले.

मागील परिस्तिथी पुन्हा ओढवून घेऊ नये. त्यावेळी लपून बसले होते आता पळता भुई कमी पडेल याचे भान ठेवावे. कायदा सुव्यवस्था सांभाळने जसे प्रत्येक जनतेचे कर्तव्या तसेच लोकप्रतिनिधी चेही आहे. असा सल्ला पॅन्थर ऑफ सम्यक योद्धा चे संस्थापक महासचिव डॉ. माकणीकर यांनी दिला.

भाजपा सत्तेत आल्यापासून भाजपाची नितिभ्रष्ट नेते मंडळी बहुजन महानायक व नायिकांवर चिखलफेक करण्याचे प्रमाण वाढले आहे. सदर प्रकार रोकने फार महत्वचे आहे. अन्यथा महाराष्ट्र पेटून बेचिराख होण्यास वेल लागणार नाही. या गोष्टीला महाराष्ट्र राज्याचे सरकार सर्वस्वी जवाबदार असेल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

शिवाय आ. राम कदमांसारख्या गुंड प्रवृत्तीला वेळीच आवरणे महत्वाचे आहे. प्रकरण निवळवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी ते भडकावत असून मंत्री चंद्रकांत वक्तव्याचे महामानवांबद्दल अवमानकारक वक्तव्याचे ते जाहीर समर्थन करत आहेत. हा प्रकार महाराष्ट्राला निंदनिय व अशोभनीय आहे. यामुळे आ. राम कदम सारख्या लोकप्रतिनिधींना वेळीच आळा घालणे गरजेचे आहे. असेही पत्रात नमूद केले आहे.

आ. राम कदमांच्या
चिथावणीखोर वक्तव्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो.मंत्री चंद्रकांत पाटलांसह आ. राम कदम यांनी सुद्धा आंबेडकर वाद्यांची माफी मागावी. मंत्री पाटील व आ. कदम यांच्या वर कायद्यानुसार कारवाई करावी. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा ईशाराही रिपाई डेमोक्रॅटिक पक्षाच्या वतीने डॉ. माकणीकर यांनी दिला आहे.

अन्याया विरूद्ध आवाज उठवणे गुन्हा आहे का?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here