Home Education अन्याया विरूद्ध आवाज उठवणे गुन्हा आहे का?

अन्याया विरूद्ध आवाज उठवणे गुन्हा आहे का?

165

भारतामध्ये धर्मनिरपेक्ष लोकशाही आहे आणि हल्लीचे वातावरण बघितले धर्मनिरपेक्ष, आणि लोकशाही दोन्ही शब्दाला डावलून द्वेषाचे राजकारण करून दोन समाजामध्ये दुफळी निर्माण करून देशाला विकण्याचे काम सुरू आहे. दूसरीकडे भारतीय संविधानाचे नाव न घेता संविधान संपुष्टात आणले जात आहे. ज्या महापुरुषांनी येथील विषमतावादी, अंधविश्वासु, पाखंडी, कर्मकांड करणारी व्यवस्था नाकारून देशाला समता बंधुता न्याय आणि स्वातंत्र्याच्या मुल्यांमध्ये गुंफन मानसाला माणुस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. हा अधिकार देताना त्यांना येथील कर्मठ, ढोंगी, पाखंडी, निच माणसिकतेच्या लोकांचा विरोध झाला तरीही कोणत्याही अडचणी यांना न घाबरता न डगमगता त्यांनी माणसाला माणूस म्हणून वागण्याचे व माणसाचे जिवन स्वाभिमानाने भरण्याचे प्रयत्न यशस्वी करून दाखवले. ते महापुरुष आमच्या साठी सर्वश्रेष्ठ आहेत.

आता आपण मुख्य मुद्द्यावर येऊ. मागिल एका महिन्यापासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पासुन तर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पर्यंत अवमानाची मालीकाच सुरू आहे. एखाद्याने बोलले असते तर समजून घेतले असते चुकिने झाले असेल त्याला माफही केले असते. परंतु येथे महापुरुषांचा अवमान मुद्दामहून केला जात आहे. कारण अवमान करणारे सर्व एकाच पक्षाचे आहेत. बर या लोकांनी जेव्हा केव्हा छत्रपती शिवाजी महाराज असतील, महात्मा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, कर्मवीर भाऊराव पाटील असतील यांचा अवमान झाला तेव्हा पक्षातील कोणताही नेत्यांनी त्यांची चुक कबुल केली नाही. बर यांना इतिहास माहिती नाही तर हे इतिहासावर बोलतातच कशाला? तर आज हे जाणीव पुर्वक घडवून आणले जाते, लोकांना भडकवले जाते. लोक भडकले की त्यांच्या हातून चुकीचे काम होते आणि चुकीचे काम झाले की तरुणांना वर केसेस दाखल केल्या जातात. केसेस झाल्या की तरुणांचे भविष्य उध्वस्त होते. सामाजिक कार्यात येण्याचे आणि अन्याया विरोधात आवाज उठवण्याचे कुणाचे धाडस होत नाही.

थोडक्यात सामाजिक आंदोलन, सामाजिक आवाज दाबण्याचा तर हा प्रयत्न नाही ना? अशी शंका निर्माण होते. राज्यपाल कोशारी असतील, प्रसाद लाड, त्रिवेदी, पडवळकर, दानवे, आणि आता चंद्रकांत पाटील. यांनी जेव्हा जेव्हा महापुरुषांबद्दल चुकीचे वक्तव्य केले, जनतेचा आवाज मोठा झाला तरीही यापैकी काहींनी साधी माफी सुद्धां मागितली नाही अथवा पक्षाने त्यांच्या वर कोणतीही कार्यवाही केली नाही किंवा त्यांना समज देखील दिला नाही की महापुरुषांचा इतिहास माहिती नसेल तर बोलु नका. उलटपक्षी पक्षाच्या नेत्यांनी त्यांना पाठीशी घालून वाचवण्याचा प्रयत्न केला. आणि अनावधानाने काही शब्द बोलल्या गेले असतील पण त्याचा चुकीचा अर्थ काढून दिशाभूल केली जात आहे अशा प्रतिक्रिया पक्षांच्या नेत्यांनी दिल्या. काही नेत्यांना विचारले ज्यांनी चुकीचे वक्तव्य केले त्यांच्या वर काय कारवाई करण्यात येईल तर हे नेते लोकप्रतिनिधी बोललेत आम्ही तुमची अडचण मुख्यमंत्र्या पर्यंत पाठवू.

मुख्यमंत्र्यांनी काय कारवाई केली याची माहिती प्रसार माध्यमांना सुद्धां नाही. पक्षातील एका नेत्याला बोलता येत नसेल, दोन नेत्यांना बोलता येत नसेल मान्य करू परंपरा येथे न बोलता येणाऱ्याची फौजच आहे. एक बोलला तर त्याचे समजू शकतो चुकिच्या पद्धतीने दाखवले जाईल पण येथे दररोज नवीन काही ना काही बोलतच असतात. अहो बोलता येत नाही इतिहास माहिती नाही तर गप्प बसा ना बोलुन अज्ञानाचा दुष्काळ तरी दाखवू नका.

आपण चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर येऊ. महापुरुषांचा अवमान झाला तेव्हा एकही शब्द न बोलणारे, निषेध न करणारे, चंद्रकांत पाटील यांच्या वर शाईफेक केली तर खुप आक्रमक झाले. सर्व प्रथम मी हे स्पष्ट करतो की कोणताही चुकीच्या कृत्याचे, वक्तव्याचे मी समर्थन करत नाही, शाहीफेक चुकीची असेल तर मी निषेध करतो. परंतु त्या तरुणाने शाई का फेकली याचा विचार करणे सुद्धां आवश्यक आहे. चंद्रकांत पाटील पैठण मध्ये म्हणतात महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर, आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुद्धां शाळा सुरू केल्या परंतु त्यांनी शासकीय अनुदान घेतले नाही तर शाळे साठी भिक मागितले. मुद्दा क्रमांक एक महापुरुषांनी भिक मागितले एवढे बोलुन सुद्धां ते म्हणतात अवमान झालाच नाही. भिक याचा अर्थ दान आणि आजच्या भाषेत सिएस आर. असे स्पष्टीकरण देऊन चंद्रकांत पाटील हसतात. या हसण्याचा काय अर्थ काय आहे? एखाद्या महापुरुषा बद्दल चुकीचे बोलायचे मग त्यावर स्वतः च न्यायधिश बनुन स्पष्टीकरण द्यायचे आणि मग पुन्हा हसायचे.

या हसण्याचा अर्थ हा द्वेष नाही तर काय आहे? मुद्दा क्रमांक दोन चंद्रकांत पाटील यांनी भिक या शब्दाचा उच्चार करताना खांद्यावरचा रुमाल समोर करून पसरवला. चंद्रकांत पाटील रुमाल समोर करून पसरवणे हे कशाचे प्रतिक आहे सांगा बर? चंद्रकांत पाटील आणि त्यांचे समर्थन करणारे सर्वांनी प्रामाणिक पणे एकच काम करायचे. चंद्रकांत पाटील यांचा रुमाल समोर करून पसरवलेला फोटो वापरा मग तुम्हाला कळेल चंद्रकांत पाटील यांचा बोलण्याचा उद्देश काय होता. रुमाल पसरवणे भिक मागण्याचे प्रतिक आहे याची हे चंद्रकांत पाटील यांना माहिती नव्हते का मुद्दाम हून हे करत आहेत. जर चुकुन झाले असते तर त्यांनी सांगितले असते चुकुन झाले माफ करा पण त्यांनी दिलगिरी व्यक्त केली ती ही स्पष्टीकरण देऊन आणि दिलगिरी व्यक्त केली पण महापुरुषांचा अवमान झाला हे त्यांनी कबूल केले नाही. जर महापुरुषांचा अवमान होतो आणि तो मान्य करण्याऐवजी त्यावर पुन्हा हसले जाते. याला द्वेष आणि जाणीव पुर्वक केले नाही तर काय म्हणाव. जर महापुरुषांचा अवमान झाला आणि त्याचा निषेध करणे, आवाज उठवणे गुन्हा आहे का? जर अन्याया विरुध्द आवाज उठवणे गुन्हा असेल तर अन्याय करणारा गुन्हेगार नाही का? यावर सुद्धा चर्चा होणे आवश्यक आहे.

मी अगोदर च स्पष्ट केले शाई फेकणे चुकीचे असेल तर मी त्याचा निषेध करतो. चंद्रकांत पाटील यांच्या बोलण्याची पद्धत त्यात केलेले हातवारे बघुन त्यांना भिकच बोलायचे होते हे तर स्पष्ट दिसते. जर भिक शब्दाचा उच्चार करायचा होता आणि शिक्षणाचे महत्त्व पटवून द्यायचे होते तर महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या नावाऐवजी दुसरे कोणाचे नाव घेता आले नसते का? या व्यतिरिक्त इतर लोकांनी शिक्षण संस्था सुरू केल्या नाहीत का? वरील महाषुरुषांचेच नाव का घेतले? बर यावर पडदा टाकताना महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री हे असे बोलले की एखादा शब्द चुकल्याने आशय बदलत नाही आशय लक्षात घेतला पाहिजे, देवेंद्र फडणवीस यांचे अगदी बरोबर आहे आशय लक्षात घेतला पाहिजे. मग साहेब आपणही जर आशय लक्षात घेतला असता तर फक्त वस्तू बदलली म्हणून आशय बदलता येत नाही. शाई ऐवजी आपण फुलं समजले असते तर त्यांचे स्वागत करण्यासाठी तेथे मंडळी उभे होते अस लक्षात आले असते.

पण तुम्ही फक्त शब्द बदलून आशय स्पष्ट करू शकत नाही, मग वस्तु बदलून पण आशय स्पष्ट करायला काय हरकत? दुसरे म्हणजे शाई फेकली तर तुम्ही आक्रमक झालात. पण एका महिन्या पासून छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील अशा महापुरुषांबद्दल अपशब्द बोलल्या जात आहेत आणि आपण तेव्हा आक्रमक झाले नाही उलट तसे काही घडलेच नाही असे सांगत बसला. मग चंद्रकांत पाटील यांच्या बद्दल सुद्धां तुम्ही बोलु शकत होते संबंधित तरुणांचा उद्देश हा शाई फेकण्याचा नसुन तो तरुण सही घेण्यासाठी आला होता परंतू गर्दी मध्ये पेनाला धक्का लागला म्हणून शाई उडाली असेल. असे बोलले असते तर आम्हाला आदर निर्माण झाला असता परंतु तुम्ही तस न बोलता शाई फेकणाऱ्या तरुणांवर खोटे नाटे कमल लाऊन त्यांना गुन्हेगार बनवत असाल तर बलात्काराची शिक्षा कमी करणाऱ्या सरकार विषयी व शिक्षा कमी करून आलेल्या बलात्कारी व्यक्तीला कोणी संस्कार क्षम व्यक्ती म्हणेल तर आपली काय प्रतीक्रीया राहील हे आपण स्पष्ट केले च नाही. बलात्कारी व्यक्तीला संस्कार मय व्यक्ती म्हणून त्याचा सत्कार केला जातो तेही तुमच्या च पक्षाचे लोक. महापुरुषांचा अवमान करणारे तुमच्या च पक्षाचे लोक. महापुरुष हे भारतीय लोकांसाठी अस्मीतेचे प्रतिक आहे त्यांच्या अस्मितेला कोणी हात लावेल तर ते शांत कसे बसणार साहेब.

त्यांच्या वर फडणवीस साहेब तुमचे नेते इतिहासाची मोडतोड करून अवमान करून अन्याय करतील. आणि या अन्याया विरोधात कुणी आवाज उठवला तर त्यांना गुन्हेगार म्हणून गुन्हे दाखल करणे योग्य आहे का? महाराष्ट्रात जेव्हा केव्हा अन्याय अत्याचार होतील तेव्हा जनतेचा आवाज मोठा होणारच. सामाजिक लोकांवर केसेस दाखल करून जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्या ऐवजी आपण जर राजकीय नेत्यांच्या तोंड बंद केली तर किमान डोक्यात असलेली द्वेषाची घाण ओठावर येणार नाही. जर ओठावर आली नाही तर गोरगरीब तरुण आक्रमक होणार नाहीत आणि त्यांचे भविष्य खराब होणार नाही याची काळजी फडणवीस साहेब आपण गृहमंत्री या नात्याने घ्यावी. आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारा गुन्हेगार नसतो याची नैतिक जाणीव असावी.
*************************************
✒️विनोद पंजाबराव सदावर्ते(रा.आरेगांव,ता मेहकर)मो:-९१३०९७९३००
*************************************

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here