Home महाराष्ट्र जिल्हा न्यायाधिश कुलकर्णी यांच्या निवास परिसरात सापाचा वावर

जिल्हा न्यायाधिश कुलकर्णी यांच्या निवास परिसरात सापाचा वावर

358

✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.2डिसेंबर):- येथील जिल्हा न्यायालय निवासस्थानामध्ये जिल्हा न्यायाधिश निवासस्थाना जवळ व त्या परिसरात दि. २७ नोव्हेंबर २२ रोजी रात्री १० वाजता व्हि. बी. कुलकर्णी त्याच्या निवासस्थानाच्या पायरीजवळ ते उभे असतांना पायरीवरच मोठा साप दिसला.

त्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून ताबडतोब त्यांच्या निवासस्थानात सुरक्षेसाठी असलेल्या दक्ष पोलीस अंमलदार सुनील पंडागळे यांना त्वरीत पाचारण केले.इतरही न्यायाधिश मंडळी त्वरीत एकत्रीत झाले व पंडागळे यांनी परिस्थीतीचे भान ठेवुन सर्पमित्र शुभम आत्राम यांना बोलविण्यात आले. त्यानंतर विषारी सापास त्यांनी तात्काळ जेरबंद केले व परात जाण्यापासुन रोकले.

त्यामुळे मोठा अनर्थ टळला. पकडलेल्या विषारी सापास सर्पमित्र यांनी जंगलात सोडून जिवदान देण्यात आले.उपस्थित न्यायाधिश मंडळीनी सर्पमित्रांना त्यांच्या या सामाजीक कार्यासाठी व तत्पर सेवेसाठी मनाासून शुभेच्छा दिल्या. मागील काही महिन्यापासुन निवासस्थान परिसरात गवत झाडे झुडपे वाढले असून त्यांच्या साफसफाईचे जिम्मेदारी बांधकाम विभागाची आहे. सध्या साफसफाईचे कामे नियमित करण्याची गरज वर्तविले आहे. अशा घटना पुन्हा होवू नये म्हणून संबंधीत विभागाच्या कर्मचा-यांना सुचना दिल्या आहेत.

महापरीनिर्वाण दिनानिमित्य जत्रा नको, खरी आदरांजली हवी!

२९ वे झाडीबोली साहित्य संमेलन आणि पितृभाषा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here