Home मुंबई कामगार दिनानिमित्त आदर्श कामगारांचा सन्मान

कामगार दिनानिमित्त आदर्श कामगारांचा सन्मान

97

मुंबई प्रतिनिधी – दैनंदिन कामकाजाची जबाबदारी पार पाडून उर्वरित वेळ समाजहित आणि समाज जागृतीकरीता देणाऱ्या आदर्श कामगारांचा सन्मान जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र दिनी मेरे अधिकार, मेरी जिम्मेदारी (मर्जी) या सामाजिक संघटनेतर्फे गोरेगाव पूर्व, युनिट क्र.३२ येथे करण्यात आला.
मर्जी या सामाजिक संघटनेतर्फे आयोजित कामगार व महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात संविधाच्या उद्देशिकेच्या सामुदायिक वाचनाने करण्यात आली. मर्जी संघटनेच्या समन्वयक प्राप्ती कोळी यांनी संघटनेची माहिती उपस्थित लोकांना दिली. सदर कार्यक्रमात मुंबई विद्यापीठाचे प्रा. रोहिदास मुंडे व प्रा. हनमंत वानोळे, प्रा.अनुजा तिवारी, कामगार नेते रमेश हरळकर, माजी न्यायाधीश डॉ. डी. के. सोनावणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ऍड.रमेश कदम यांची या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमात बेअर फूट लॉयर प्रशिक्षण शिबीरात सहभागी प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले तसेच सामाजिक भान असलेले सफाई कामगार प्रमोद नागोठणेकर, गुणवंत कांबळे यांना आदर्श कामगार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मर्जी संघटनेकडे समस्या घेऊन आल्यानंतर त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी स्वत:ही पुढाकार घेणाऱ्या पीडीतांना संघर्षशील व्यक्तिमत्व २०२४ सन्मान देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेचे कार्यकर्ते वंदना झेवियर्स, तुषार ढिवरे, सागरिका जाधव, विशाल वळंजू, दिनेश रामन, दिपक शिंदे, अमोल मनोहर, दिपक वानखेडे, प्रतिभा चिखले, योगिता गायकवाड, वैष्णवी कदम, सत्यवती धनेश्वर नाई, पंकज जैसवार, महेश गुप्ता, विद्यासागर कांबळे, आसावरी जाधव आदींनी सक्रिय योगदान दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here