Home चंद्रपूर करोली गावामधे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती सजारी

करोली गावामधे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती सजारी

46

 

सावली:- सावली तालुक्यातील करोली गावामधे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. महात्मा फुले यांच्या प्रतिमेस उपस्थित पाहुण्यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष भोजराज गेडाम माजी पोलिस पाटील करोली,
उपाध्यक्ष शिलाताई लोहंबरे सरपंच ग्रा.पं.करोली
प्रमुख पाहुने नामदेवरावजी जेंगठे ब्रम्हपुरी,सूरज ढोले ता. माळी समाज अध्यक्ष सावली, प्रवीण ढोले सर ता. माळी समाज उपाध्यक्ष सावली, काशीनाथ मोहुर्ले ता. माळी समाज सचिव सावली व मोठ्या प्रमाणात गावकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुने नामदेवरावजी जेंगठे यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याचे महत्त्व सांगत त्यांचा जीवनावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे संचालन मोरेश्वर चौधरी, कार्यक्रमाची प्रस्तावना ईश्वर मेश्राम तर कार्यक्रम समारोप प्रफुल्ल चौधरी यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here