Home लेख लढला नाही तरी चालेल, पण विकल्या जाऊ नकोस!

लढला नाही तरी चालेल, पण विकल्या जाऊ नकोस!

58

लोकसभा निवडणुकीचे वारे कोणा कोणाला अस्वस्थ करीत आहेत, तर काहीना पोटभर पंच पक्वान्ने खायला असून ही खायाला मन होत नाही.त्यामुळेच शांत झोप लागत नाही, काहीना किती ही धन खर्च हो विजय आपलाच झाला पाहिजे असे वाटत असल्यामुळे तो सर्वच खरेदी करण्याच्या तयारीने काम करीत आहेत. तर काही देशातील बेरोजगारी, महागाई, भ्रष्ट्राचार,शिक्षण,आरोग्य यामुळे गेल्या नऊ वर्षात नागरिकांचे झालेले बेहाल यावर आकडेवारी देऊन पोटतिडकीने बोलत आहेत. त्यामुळेच त्यांना “अत्यंत महत्वाचे..करो या मरो.” असे लोकसभा निवडणुकीत झाले पाहिजे असे वाटत आहे. आणि माझ्या सारख्याला प्रत्येक जातीची मतदार संघातील लोकसंख्या डोळ्या समोर उभी राहत आहे. कोणत्या जातीचे लोक मतदार म्हणून प्रामाणिकपणे मत दान करतील तर कोणता उमेदवार खासदार म्हणून निवडून येऊ शकतो याची उपब्धतेनुसार आकडेवारी मांडतांना दिसत आहे.सरासरी पाच लाख मत मिळाल्यांनतर एक खासदार निवडून येतो.
तिन टक्के असलेला समाज पंधरा टक्केवाल्यांना पुढे करून पांच्याशी टक्केवाल्यांना कायम गुलाम लाचार बनवत असतो. त्यात गर्वसे कहो हम हिंदू है म्हणणारे बावन्न टक्केवाले तीन हजार सहाशे जातीत विभागलेले मागासवर्गीय ओ बी सी बहुजन समाजाच्या टक्केवारी नुसार एकत्र येऊन शक्ती दाखवत नाही. त्यासाठी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सांगीतले होते,लढला नाही तरी चालेल पण विकल्या जाऊ नको.
मतदासंघातील बहुजन समाजातील बावन्न टक्के ओबीसी बाजूला ठेवला तरी प्रत्येक मतदारसंघांमध्ये खालील प्रमाणे बौद्धांची संख्या आहे.1) मुंबई दीड करोडपैकी 40 लाख,2) नागपूर 35 लाखापैकी 12 लाख,3) अमरावती 20 लाखापैकी 8 लाख, 4) वर्धा पंधरा लाखापैकी 6 लाख,5) अकोला 20 लाखापैकी 8 लाख, 6) सोलापूर 19 लाखापैकी 8 लाख, 7) औरंगाबाद वीस लाखापैकी 7 लाख, 8) नाशिक 35 लाखापैकी 9 लाख, 9) सातारा 22 लाखांपैकीी 8 लाख,10) अहमदनगर 22 लाखांपैकी 7 लाख,11) वाशिम 15 लाखापैकी 7 लाख,12) बुलढाणा 15 लाखापैकी 7 लाख,13) कल्याण डोंबिवली 20 लाखापैकी 7 लाख. म्हणजेच 48 पैकी 13 मतदारसंघ आंबेडकरी विचारांच्या बौद्धांचे खासदार कोणाचे सहकार्य न घेता निवडून येऊ शकतो त्यासाठी एकजूट दाखवून लढले पाहिजे. पण होऊ शकत नाही हीच मानसीकता बनलेली असेल तर असे लोक खुप अडचणी व समस्या निर्माण करण्यासाठी विकलेले असतात. तीच त्यांची गुणवंत कला कौशल्य असते, तो मग आपल्याच समाजात समाजा बद्दल, नेत्या बद्दल,कार्यकर्त्या बद्दल वैचारिक गैरसमज मतभेद निर्माण करण्यासाठी यशस्वी होत असतो. प्रथम असा लोकांना आपण ओळखले पाहिजे.
लोकसभा निवडणुकी नंतर विधानसभा निवडणूक येणार आहे. बौद्ध मतदारांना खरेदी करण्यासाठी सर्वच पक्षाचे उमेदवार सरसावले आहे. पण बौद्ध मतदाराना माझे आव्हान आहे कि तुम्ही तुमच्यावर झालेला अन्याय विसरु नका.भिमाकोरेगाव दंगल झाल्यानंतर प्रत्येक गावात झालेल्या दंगली विसरु नका. भाऊ, दादा, नाना, आबा, बाबा, ताईसाहेब, वहिनीसाहेब असे अनेक नेते आता बौद्ध मतदाराना भुरळ घालण्यासाठी बाबासाहेबांचे नांव दिवसरात्र घेत आहेत. त्यात १३३ वी भिम जयंती असल्यामुळे सर्वांचे प्रेम उतू चालले असेल. पण हिच वेळ आहे यांना त्यांची योग्य जागा दाखविण्याची. आणि जो आपल्या वेळेला धावुन येईल तोच, आपला नेता समजावा. असा नेता आंबेडकरी चळवळीतील समाजासाठी झटणारा कार्यकर्ता नेता म्हणजेच उमेदवार निवडून द्या. आणि आपले ताकत आपले मत वाया जाऊ देऊ नका,पक्ष फक्त आंबेडकरी विचार जपणारा असावे नेता आणि पक्ष बहुजन हिताची आणि एस सी,एस टी,ओबीसी जनतेला साथ देण्याची असावी. दारु, मटण, पैसा याला बळी न पडता. वंचित बहुजन आणि बौद्धांनी एकत्र राहून एक मताने मतदान करणे आवश्यक आहे.आता चुक केली तर येणारी पिढी हि गुलाम म्हणूनच जन्माला आल्या शिवाय राहणार नाही. म्हणूनच बहुजनानी आता एकच नारा दिला पाहिजे. “बहुजन हिताय!बहुजन सुखाय!”
बहुजन समाजातील मतदार बंधुनो, आपली स्वतःची ताकद ओळखा. तुम्ही कोणत्याही आंबेडकरी संघटनेशी एकनिष्ठ असा.परंतु यावेळेस मात्र तुमचे अमूल्य मत वंचित बहुजन आघाडीलाच द्यावे असे मी आवाहन करतो. कारण आत्तापर्यंत आपण दुसऱ्यांना मतदान केलेले आहे.त्याचा किती उपयोग झाला ते आपल्या सर्वांना माहीत आहे. उलट नुकसानच झाले आहे.आता मात्र तुमचे मत वाया घालवू नका. सर्वांनी सर्व हेवे – देवे विसरून मतदान केले तर 10 तरी खासदार निवडून येऊ शकतात.आणी आमदारकीला 50 पेक्षा अधिक आमदार येऊ शकतात.म्हणजे मुख्यमंत्री सुद्धा आपलाच होऊ शकतो. होऊ शकते ही इच्छाशक्ती आणि मानसिकता तयार करून ठेवा.
मान्यवर कांशीराम यांनी हे उत्तर भारतात चार वेळा करून दाखवले. त्यासाठी त्यांनी केलेले कार्य प्रबोधन कष्ट, त्याग पडीक जमिनीवर केलेली मशागत म्हणजे स्वाभिमान गमावलेल्या बहुजन समाजात न बिकने वाला समाज तयार केला तेव्हा चार वेळ सरकार बनले.एड प्रकाश यशवंतराव आंबेडकर यांनी ही स्वबळावर अनेक प्रयोग करून दाखवले म्हणूनच आज राज्यात त्यांची राजकीय शक्ती म्हणूनच दखल घेतली जाते. त्यांची शक्ति आपण सर्व आहोत. बाकी बाबासाहेबांच्या नावाचा जय जय कार करणारे रोजनदारी, सलगडी म्हणून निळा झेंडा खांद्यावर घेऊन स्वताच्या पोटासाठी आणि अस्तित्वासाठी काम करतांना दिसतात. त्यांना समाजाचे आंबेडकरी विचारांचे आणि संविधानाचे काही घेणे देणे नाही. काही बुद्धिजीवी विचारवंत घरात बसून आपली विद्वता पणाला लावून वैचारिक मतभेद निर्माण करण्यासाठी डोळ्यात तेल घालून लिहत आहेत. म्हणूनच त्यांना ही सांगणे आहे.लढला नाही तरी चालेल, पण विकल्या जाऊ नकोस.
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, मान्यवर कांशीराम यांनी सांगितले होते. आणि आता बाळासाहेब एड प्रकाश आंबेडकर सांगत आहेत. हे निवडणूक स्वताच्या अस्तित्वाची असणार आहे. ही ताकद लोकसभेत दिसली तर पुढे तुमच्या आंदोलनाला तलवारीची लेखणीची धार असणार आहे. अन्यता मतदार संघातील मतदारांची संख्या ही गुलाम लाचार लोकांची नव्हे मुक्या जनावरांची गणल्या जाईल. हे प्रत्येक आंबेडकरी विचारांच्या मतदारांनी लक्षात ठेवावे. म्हणूनच कोणाचे नुकसान होईल कोणाचा फायदा होईल यांचे गणित करत बसू नका.आदेशाची निर्णयाची अंमलबजावणी करा.विजय आपलाच संख्येच्या बळावर गणिताच्या सूत्रानी होऊ शकतो. एकमेकावर आणि महापुरुषांच्या विचारावर विश्वास ठेवा. नसेल तर घरात बस.उपाशी मरा. पण दररोज श्रम विकून पोट भरता तसेच मत विकून पोट भरू नका, त्याची शिक्षा पाच वर्ष नव्हे पिढ्यान पिढ्याला भोगावी लागते हे लक्षात ठेवा. म्हणूनच वंचित बहुजना, बौद्ध म्हणून घेणाऱ्या मतदारा.लढला नाही तरी चालेल,पण विकल्या जाऊ नकोस.इतिहास लढणाऱ्यांचा लिहल जातो. लाचारी करणाऱ्या भटांचा भाटांचा नाही.
सागर रामभाऊ तायडे, भांडुप,मुंबई.
९९२०४०३८५९

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here