Home यवतमाळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतीबा फुले सयुक्त जयंती

डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतीबा फुले सयुक्त जयंती

19

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466

उमरखेड (दि. १० एप्रिल)
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या व बाबासाहेबाचें गुरु महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधुन स्थानिक बोरबन येथील सुमेद्ध बोद्धी धम्म प्रसारक मंडळच्यावतीने ११ ते १४ एप्रिल पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले.

यांच्या अंतर्गत दि.११ एप्रिल महात्मा ज्योतीबा फुले जयंती निमित्य प्रबोधन सत्राचे रितसर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन संध्याकाळी ७ वा. होईल.

या सत्राचे अध्यक्ष प्रा.धनराज तायडे या सत्रात प्रमुखव्याख्याते प्रा.डॉ.अनिल काळबांडे हे महात्मा ते बाबासाहेब व भारतीय संविधान ह्या विषयी मांडणी करतील तसेच पुरोगामी युवा ब्रिगेडचे प्रवक्ते शाहरुख पठाण सर हे मुस्लीमसमाज व बाबासाहेब ह्या विषयी आपले विचारप्रकट करतील.

दि.१३ एप्रिलला महिलांचे व बालकांचे विविध स्पर्धा, तसेच समाजप्रबोधन व मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळाने केले आहे.

तसेच दि.१३ एप्रिल सायंकाळी ५ वाजता उमरखेड ऑयडल भिम गित गायन स्पर्धेचे आयोजन केले असून त्या करीता १०० रु. प्रवेश फि असुन ३०००,२०००,१००० ह्या प्रमाणे बक्षीस ठेवण्यात आले आहे, ह्या कार्यक्रमाचे आयोजक संतोष निथळे ह्यांच्याकडे नांव नोंदनी करण्यात येत आहे व १४ एप्रिलला सकाळी ९ वाजता सुमेध्द बोद्धी विहारात पंचशिल ध्वजारोहण मान्यवराच्या हस्ते होणार आहे ह्या कार्यक्रचे अध्यक्ष माजी आमदार विजयराव खडसे व प्रमुख उपस्थिति सामाजिक कार्यकर्ते साहेबराव कांबळे साहेब राहतील व सायंकाळी ४ वाजता भव्य धम्म मिरवणूक व महिलांचे लेझिम पथक राहणार आहे. तरी सर्व समाजबांधवानि कार्यक्रमाला उपस्थित राहून लाभ घ्यावा असे विहार समितीच्या वतीने करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here