Home यवतमाळ सम्यक बुद्ध विहार येथे महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी

सम्यक बुद्ध विहार येथे महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी

30

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466

उमरखेड (दि. 11 एप्रिल) शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर वार्ड मधील सम्यक बुद्ध विहार येथे क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

सर्वप्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमांना उपस्थित सर्वांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

तसेच भदंत कीर्ती बोधी यांनी यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकून मोलाचे मार्गदर्शन केले.
ते म्हणाले की, जोतीराव गोविंदराव फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी झाला होता.

महाराष्ट्रातील एक सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, जातिविरोधी समाजसुधारक आणि लेखक होते.
सामाजिक प्रबोधन, अस्पृश्यता व जातिव्यवस्थेचे निर्मूलन, आणि स्त्रियांना व मागास जातीच्या लोकांना शिक्षण देण्याचे कार्य त्यांनी कार्य केले. अशी माहिती भदंत कीर्ती बोधी यांनी सांगून मार्गदर्शन केले.
यावेळी उषाताई इंगोले (अध्यक्षा डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती), उपाध्यक्षा भारतीताई केंद्रेकर, सचिव कांचन दिवेकर, उज्वला धबाले, विद्या इंगोले, मधुबाला दिवेकर, कोषाध्यक्ष बेबीबाई गवंदे, सुनीता दिवेकर, संघटक स्वाती दिवेकर, जिजाबाई दिवेकर, जानकाबाई इंगोले, सुभाद्राबई पाईकराव, रंजनाबाई इंगोले, साधनाबाई, संतोष इंगोले पत्रकार सिद्धार्थ दिवेकर इत्यादी अनेक जण उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here