Home यवतमाळ पुसद येथे धम्मक्रांती प्रज्ञापर्वात संतोष जोंधळे यांच्या बुध्द भिम गीताचा बहारदार कार्यक्रम...

पुसद येथे धम्मक्रांती प्रज्ञापर्वात संतोष जोंधळे यांच्या बुध्द भिम गीताचा बहारदार कार्यक्रम संपन्न

32

बाळासाहेब ढोले, विशेष प्रतिनिधी मो. 78751 57855
पुसद : पुसदकरांना मंत्रमुग्ध करणारा कार्यक्रम फॉरेनला धनी माझे गेले ग बाय… फ्रेम सिनेगायक संतोष जोंधळे नाशिक यांचा बुद्ध भीम गीताचा प्रबोधन पर कार्यक्रम संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष ययाती नाईक
तर विशेष अतिथी म्हणून प्रकाश झळके, डॉ. अतुल रुणवाल,आनंद भगत, अनंतराव कांबळे, प्रभाकर टेटर, किशोर कांबळे, बुद्धरत्न भालेराव, प्रज्ञापर्वाचे अध्यक्ष अर्जुन भगत, हे प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात सर्व मान्यवरांच्या हस्ते महापुरुषाला अभिवादन करून तथागत नगर येथील यशोधरा महिला मंडळांनी सुमधुर अशा आवाजामध्ये सामूहिक रित्या बुद्ध वंदना सादर केली. उपस्थित मान्यवरांचा स्वागत, सत्कार करण्यात आला.

यावेळी अध्यक्ष मनोगतामध्ये ययाती भाऊ नाईक यांनी जय भीम च्या जयघोषाने संपूर्ण परिसर मंत्रमुग्ध करून टाकला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती एका विशिष्ट समाजाची नसून ती संपूर्ण भारतवासीयांची आहे आणि आपण सर्वांनी ती उत्साहात साजरी केली पाहिजे मी बाबासाहेबांचा कट्टर पाईक असून बाबासाहेबांची विचार अनुसरतो.
असे गौरव उद्गार काढले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल भालेराव यांनी केली तर आभार प्रदर्शन सुरेश कांबळे यांनी केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अर्जुन भगत, देवेंद्र खडसे, शरद ढेंबरे , बाबाराव उबाळे, ल. पु.कांबळे, विजय निखाते, आर. पी .गवई, प्रफुल भालेराव, मिलिंद जाधव,राहुल पाईकराव, निर्भय गायकवाड,विजय पाटील, प्रमोद धुळे,गोदाजी जमदाडे, मधुकर सोनवणे, हेमंत इंगोले,सनी पाईकराव, अर्जुन केळकर,राजू कांबळे, अंबादास कांबळे, आनंद खडसे,अक्की पाईकराव,दौलत हाडसे, संजय वाढवे,प्रीतमआळने,उत्तम कांबळे,सुभाष गायकवाड,बाळासाहेब कांबळे, संदीप कावळे, भारत कांबळे, सुरेश कांबळे,यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाला महिला, पुरुष प्रचंड संख्येने उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here