Home महाराष्ट्र मोर्शी वरूड तालुक्यात गारपीट नुकसानीची पाहणी करतांना आमदार देवेंद्र भुयार हळहळले !...

मोर्शी वरूड तालुक्यात गारपीट नुकसानीची पाहणी करतांना आमदार देवेंद्र भुयार हळहळले ! आमदार देवेंद्र भुयार सर्वेक्षणासाठी अधिकाऱ्यांना घेऊन पोहचले शेतकऱ्यांच्या बांधावर !

41

 

मोर्शी तालुका प्रतिनिधी /
मोर्शी वरूड तालुक्यात मंगळवार व बुधवारी झालेल्या गारपिट वादळी वारे आणि गारांच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी तातडीने याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत व पुनर्वसन मंत्री अनील पाटिल यांना कळवत पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. गारपीट झाल्याने संत्रा फळबागा उद्ध्वस्त झाल्या, कांदा गहू भाजीपाला यासह विविध शेतीपिकाचे मोठे नुकसान झाले, याचा मोर्शी वरूड तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला. मोर्शी वरूड तालुक्यातून रात्री उशिरापर्यंत नुकसानीची अस्वस्थ करणारी माहिती पुढे येत होती. त्यामुळे आमदार देवेंद्र भुयार यांनी मोर्शी वरूड तालुक्यात महसूल व कृषी अधिकाऱ्यांना सोबत घेऊन शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन भल्या सकाळीच पाहणी दौरा सुरू केला. थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न सुरू केला.
मोर्शी वरूड तालुक्यामध्ये गारपिट व वादळी अवकाळीने झालेल्या नुकसानीची पाहणी करताना शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकुण नुकसान पाहणीसाठी आलेले आमदार देवेंद्र भुयार महसूल व बकृषी विभागाचे अधिकारी, पदाधिकारी हळहळले. मराठी नवीन वर्षाच्या सुरवातीला नुकत्याच झालेल्या गारपीट अवकाळी पावसाने संत्रा मोसंबी, गहू भाजीपाला यासह सर्व पिकांचे मोठे नुकसान झाले. हाती आलेले पीक संपुर्णपणे नष्ट झाले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात आश्रु तरळले. ते पाहून पाहणीसाठी गेलेले आमदार देवेंद्र भुयार देखील हळहळले.
मोर्शी वरूड तालुक्यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. आमदार देवेंद्र भुयार यांनी सोमवार मंगळवारी गारपिट वादळी व अवकाळी पावसाने झालेल्या महासून व कृषी नुकसानीची पाहणी केली. मोर्शी वरूड तालुक्यातील विविध गावातील जवळपास ५० हजार हेक्टरवरील संत्रा बागांचे शंभर टक्के नुकसान होऊन कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. याच नुकसानीची पाहणी करताना शेतकऱ्यांची व्यथा व तडे गेलेल्या संत्रासह कोलमडलेल्या शेतकऱ्यांना भेटताना आमदार देवेंद्र भुयार यांनी हळहळ व्यक्त केली.
गारपिट वादळी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा पार चुराडा केला. कर्ज काढून प्रचंड खर्च करून संत्रा बागा उभ्या केलेल्या आहेत. डोळ्यांदेखत एवढे नुकसान शेतकऱ्यांना सहन होण्यापलीकडचे आहे. अशावेळी आमदारांनी या शेतकऱ्यांना भेटून दिलासा दिला. शासनाकडे पाठपुरावा करून भरीव मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्‍वासन देवेंद्र भुयार यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here