Home महाराष्ट्र वरूड मोर्शी तालुक्यात गारपिट, अवकाळी वादळी पावसाचा कहर ! अवकाळी पाऊस...

वरूड मोर्शी तालुक्यात गारपिट, अवकाळी वादळी पावसाचा कहर ! अवकाळी पाऊस गारपिट नुकसानीची तत्काळ मदत जाहीर करा — आ. देवेंद्र भुयार आ. देवेंद्र भुयार यांची मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्याकडे मागणी !

27

 

वरूड तालुका प्रतिनिधी /
मोर्शी वरूड तालुक्यामध्ये दिनांक ८ एप्रिल व ९ एप्रिल रोजी झालेल्या वादळी अवकाळी पावसामुळे व गारपीटीमुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे आंबिया बहार संत्राच्या ५० हजार हेक्टर क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून मोसंबी, गहू, भाजीपाला यासह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे मोर्शी वरूड तालुक्यातील वादळी अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करुन तात्काळ अनुदान वाटप करण्याबाबत मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून तत्काळ पंचनामे करून नुकसानीचा अहवाल शासनाला पाठविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांना दिले असल्याची माहिती आमदार देवेंद्र भुयार यांनी यावेळी दिली.
मोर्शी वरुड तालुक्यात दिनांक ०८ एप्रील २०२४ च्या मध्यरात्रीपासून दिनांक ९ एप्रिल रोजी रात्री १० वाजेपर्यंत सतत गारांचा वर्षाव व अवकाळी वादळी वा-यासह पाऊस झालेला आहे. सदर झालेल्या गारांमुळे व वादळी वा-यासह
पावसामुळे शेतक-यांचे गहू, हरबरा इत्यादी पिकांचे तसेच संत्रा व मोसंबी इत्यादी फळ पिंकांचे आंबीया बहाराचे प्रचंड नुकसान झालेले आहे. व त्यामुळे शेतकरी अत्यंत आर्थिक अडचण आलेला आहे.

चौकट :- मोर्शी वरूड तालुक्यात संत्रा मोसंब, गहू, भाजीपाला, यासह विवीध शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करुन शेतक-यांना तातडीने मदत करण्यासाठी संबधितांना निर्देश देऊन झालेल्या शेतीपिकांचे नुसानीचे पंचनामे करून तसा अहवाल शासनाकडे तात्काळ सादर करून नुकसान ग्रस्त शेतक-यांना तातडीने अनुदान वाटप करण्यात असे निर्देश जिल्हाधिकारी यांना दिले आहे.– आमदार देवेंद्र भुयार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here