Home महाराष्ट्र राष्ट्रीय कलाउत्सव राज्यस्तरीय शास्त्रीय गायनात गौरव भुकन तृतीय.

राष्ट्रीय कलाउत्सव राज्यस्तरीय शास्त्रीय गायनात गौरव भुकन तृतीय.

34

 

नगर: (दि. १0 ) केंद्रीय शिक्षण मंत्रालय, शालेय शिक्षण व साक्षरता विभाग,नवी दिल्ली तसेच शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने राज्यस्तरीय शास्त्रीय गायन स्पर्धेत अहमदनगर येथील भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलचा इयत्ता दहावीचा विद्यार्थी गौरव विजय भुकन ने राज्यस्तरावर तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.
जिल्हास्तरावर गौरवने प्रथम क्रमांक प्राप्त केला होता. त्यानंतर पुणे येथे राज्यस्तरीय स्पर्धा पार पडली. भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल चे मुख्याध्यापक उल्हास दुगड सर, पर्यवेक्षक गिरी सर, वावळ सर, सातपुते मॅडम, संगीत मार्गदर्शक मुळे सर यांच्या उपस्थितीत गौरवचा सत्कार करण्यात आला. गौरवचे संगीताचे प्राथमिक शिक्षण भाऊसाहेब फिरोदिया म्युझिक अॅकेडमीमध्ये झाले आहे. यापूर्वी तालुका, जिल्हा, राज्यस्तरावर, बालसंगीत, गायन अशा स्पर्धांमध्ये गौरवने अनेक पारितोषिके पटकावली आहेत. टॅलेंट ऑफ अहमदनगर स्पर्धेतही तो प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला होता. विद्यालयाच्या वतीने सर्वाधिक बक्षीस पात्र उत्कृष्ट बालगायक म्हणूनही गौरवला सन्मानित करण्यात आले आहे. शास्त्रीय गायन मध्यमा पूर्ण परीक्षेत नुकताच तो प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला असून विशारद प्रथम परीक्षेची तयारी करत आहे. संगीताशिवाय गौरवला लेखन, वाचनाची आवड असून त्याचा बालकथासंग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहे. या स्पर्धेत तबल्याची साथ प्रतीक गिरवले यांनी केली होती. गौरवने यशाचे श्रेय संगीत मार्गदर्शक गुरूंना दिले आहे.
गौरव भुकन च्या या यशाबद्दल शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक सुनील गोसावी,अध्यक्ष राजेंद्र उदागे यांच्यासह अनेकांनीं अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here