Home लेख महात्मा फुले यांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले नसते तर?

महात्मा फुले यांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले नसते तर?

32

 

महात्मा फुले यांच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देणाऱ्या खालील ओळी प्रसिद्ध आहेत:

विद्येविना मती गेली ।
मतीविना नीती गेली ।
नीतीविना गती गेली ।
गतीविना वित्त गेले ।
वित्ताविना शूद्र खचले।
इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।

अडीचहजार वर्ष सांस्कृतिक दहशतवाद निर्माण करणाऱ्यांना आज १९७ वर्षा नंतर ही महात्मा फुले नांवाची भीती वाटते.बहुजनांच्या मेंदूवर भक्कम पकड असणारे मनुवादी भट ब्राम्हण आज ही महात्मा फुले यांच्या रोखठोक विचारांना घाबरून वागतात. फुलेंना ते बाबा, महाराज, संत बनू शकले नाही. तेहतीस कोटी देवा देवीची फौज महात्मा फुलेच्या सडेतोड प्रश्नांना उत्तरे देऊ शकले नाही. ज्यांनी महात्मा फुले यांच्या शेतकऱ्याचा आसूड वाचला, त्यांनी उभे केलेले धोंडिबा, कोंडीबाचा सवाल जबाब वाचला तर तो कोणालाही प्रश्न विचारण्याची हिंमत करू शकतो.अशा एका माणसाची १९७ वर्षा नंतर ही महात्मा फुले नांवाची भीती वाटावी असे महान तत्वज्ञान त्यांनी निर्माण करून ठेवले. म्हणूनच विचारतो महात्मा फुले यांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले नसते तर?

बहुजन समाजाचे अज्ञान,दारिद्ऱ्य आणि समाजातील जातिभेद पाहून त्यांनी ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा निश्चय केला. त्यांनी इ.स.१८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात महाराष्ट्रातील मुलींची पहिली मराठी शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी पत्नी-सावित्रीबाईंवर सोपविली. आणि यानंतर जोतीबांनी अस्पृश्यांसाठी शाळा सुरू केल्या.हा इतिहास आज ही विसरता येत नाही. म्हणूनच ते आजही कुठे तरी जिवंत असल्याचे किंवा आपल्या आजूबाजूला असल्याचा भास होतो. इतरांचे माहिती नाही, पण मी सत्यशोधक कामगार संघटना ७ जुलै १९८२ ला स्थापन केली तेव्हा पासून त्यांचे क्रांतिकारी विचारांचे प्रबोधन दररोजच्या जगण्यात नाका कामगार, घर कामगार एकूण असंघटित कामगारांच्या समस्या वर प्रबोधन करून त्यांच्या विचारांचा वारसा जपला.म्हणूनच १९७ वर्षा नंतर ही महात्मा फुले नांवाची भीती वाटावी असे सत्यशोधक आज ही समाजात आहेत. ते न घाबरता बोलतात, लिहतात, मांडणी करून भांडतात. जिस समाज का इतिहास नही होता है,वह कभी शासक नही बन पाता है, क्योकी इतिहास से प्रेरणा मिलती है,प्रेरणा से जागृती आती है,जागृती से सोच बनती है,सोच से ताकत बनती है,ताकत से शक्ती बनती है, और शक्ती से शासक बनता है, ब्राम्हण सोडून सर्व ब्राम्हणेतर म्हणजेच आजचा ८५ टक्के बहुजन समाज त्यात बहुसंख्य मागासवर्गीय ५२ टक्के ओबीसी तरी या देशाचे वैचारिक मानसिक गुलाम झाले आहेत. तरी तीन टक्के वाल्यांना १९७ वर्षा नंतर ही महात्मा फुले नांवाची भीती वाटते. म्हणूनच मी लिहतो महात्मा फुले यांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले नसते तर?

भारतीय कामगार चळवळीचे जनक रावबहादूर नारायण मेंघाजी लोखंडे यांना असंघटीत कामगारांना संघटित करण्याची प्रेरणा देणारे आणि भारतात महिलांना शिक्षण घेण्यासाठी स्वतःच्या पत्नीला सावित्रीबाई यांना शिक्षण घेण्यास सतत प्रेरणा देणारे ज्योतीराव गोविंदराव फुले म्हणजे महात्मा ज्योतीराव फुले, ग्रामीण भागात आजही जोतीराव,ज्योतीराव नाही तर ज्योतिबाच म्हटल्या जाते. भटा ब्राम्हणांनी मराठा मागासवर्गीय समाजात एक म्हण पेरून ठेवली आहे.ती म्हणजे “हाले डुले महात्मा फुले” माथाडी कामगारात विशेष कोल्हापूर, सांगली, सातारा,पुणे,नगर जिल्ह्यातील कामगार मंडळी या म्हणीचा जास्त शब्द प्रयोग करतात. त्यांना महात्मा फुले यांचा ऐतिहासिक इतिहास माहीत नाही.म्हणूनच ते असे म्हणतात. त्यांना शिक्षणा पेक्षा देव दर्शन, पायी पदयात्रा जास्त लाभ दायक वाटतात.
जोतीरावांचा जन्म ११ एप्रिल १८२७ ला झाला. अवघ्या तीन वर्षांनी या घटनेला २०० वर्षे पूर्ण होतील. त्यांना ६३ वर्षांचे आयुष्य लाभले.कोणताही महापुरूष हा त्या काळाच्या मर्यांदांनी वेढलेला असतो. फुले द्रष्टे, योद्धा आणि समाजक्रांतिकारक होते. विषमता, असमानता अन्याय अत्याचाराच्या विरोधात नेहमी लढणारा माणूस त्यावेळी सनातनी भटा ब्राम्हणांच्या हिट लिस्टवर होता. त्यामुळे त्यांना जागोजागी संकटाचा सामना करावा लागे. यावर त्याने बुद्धीचातुर्याने मात केली. आजच्या सारखी जीवघेणी नीतिमत्ता नसलेले हिंसाचारी लोक तेव्हा नव्हते असे म्हटले तर चूक ठरणार नाही. त्यावेळची परिस्थीती आम्ही वाचली आहे पण आज लोकशाही असूनही प्रशासकीय व्यवस्थेतील मनुवादी किती हिंसक पणे मागासवर्गीय समाजाच्या तरुणांना वागणूक देतात. ते सोशल मीडियावर पाहिल्यावर अंगावर काटा उभा राहतो. मग ज्योतीराव फुले यांनी सावित्रीबाईला शिक्षण देऊन मुलीची शाळा काढून किती मोठा संघर्ष केला असेल यांची कल्पनाच केल्या जात नाही. म्हणूनच विचार करा महात्मा फुले यांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले नसते तर?
आजच्या जागतिकीकरणाच्या संघर्षशील जिवनात असे काही महापुरुष, महात्मे शोधून ही सापडणार नाहीत. काही शिक्षण सम्राट आहेत पण त्यांच्या कडून कोणताही आदर्श घेण्याच्या लायकीचे ते नाहीत.त्याच बरोबर ज्योतीराव फुले उत्तम बिल्डर उद्योगपती आणि कार्यकारी संचालक होते हे आम्ही कधी वाचलेच नव्हते. पण हरी नरके सारख्या बुद्धिजीवी विचारवंतांनी त्यांच्या या ऐतिहासिक कार्याचा अभ्यास करून जागा समोर मांडला परंतु त्यावर व्यापक चर्चा होतांना दिसत नाही. ज्योतीराव फुले यांच्या कंपनीनं केलेली महत्त्वाची कामे वस्तु आजही लक्षवेधी आहेत पण त्यांची पाहिजे त्या प्रकारे दाखल घेतल्या जात नाही. कात्रजचा बोगदा,येरवड्याचा पूल आणि खडकवासला धरणाचा कालवा कोणी बांधला? कधी बांधला? या बाबत कोणी विचारत नाही. कारण यावर चर्चा सुरू झाल्यास आजच्या तरुणांना एक प्रेरणादायी सत्य इतिहास समोर येईल या भीतीने त्यावर चर्चाच होत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्योतीराव फुलेंना गुरुस्थानी मानायचेच अनेकांना आज भी काळजाला झोबंते. त्यामुळे बाबासाहेब फुलेनां गुरूस्थानी मानायचे आणि फुले यांचा वारसा आपण कायम उराशी बाळगू असे अभिमानानं सांगायचे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा समाज आज ही फुलेंच्या विचारांशी प्रामाणिक राहुन उठता बसता त्यांच्या विचारला प्रतिमांना त्रिवार प्रणाम करतो.आणि महात्मा फुले यांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले हे शंभर टक्के मान्य करतो.
ज्योतीरावांनी सर्वांना शिक्षण, ज्ञाननिर्मिती, कौशल्यनिर्मिती, स्त्री-पुरुष समता, जातीनिर्मुलन, संसाधनांचे फेरवाटप, धर्मचिकित्सा आणि आंतरजातीय विवाह या कार्यक्रम पत्रिकेच्या आधारे आधुनिक भारताच्या पायाभरणीचे ऐतिहासिक काम करून ठेवले म्हणून आज त्यांची फळ आपण मुक्तपणे खातो. महात्मा फुले यांच्या क्रांतिकारी विचाराचा वारसा आंबेडकरी चळवळ पुढे नेत आहे त्याला मागासवर्गीय समाजाने खऱ्या अर्थाने साथ दिल्यास केंद्रात फुले शाहु आंबेडकर विचारांचे सरकार स्थापन होऊ शकते. त्यासाठी त्यांनी महात्मा फुले यांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले नसते तर? आपण कुठे असतो याचा विचार करावा.
मान्यवर कांशीरामजी यांनी उत्तर भारतात या महापुरुषांच्या क्रांतिकारी विचारांची पेरणी करून ठेवली आहे. पण काही मागासवर्गीय समाजातील गुलामांनी त्याला सुरुंग लावला होता. शत्रू पक्षाच्या विचारधारेच्या नेत्यांना केवळ आर्थिक लाभा करीता संघटनेत सहभागी करून घेतल्यामुळे क्रांतिकारी विचारांचे कॅडर बेस संघटन मागे पडले आणि लीडर बेस लोक पुढे आले त्यामुळे पक्ष संघटनेवर परिणाम झाला. त्यांचे फळ आज उत्तर भारतीय जनता भोगत आहे. व्यक्ती पेक्षा संघटन मोठे असते, संघटने पेक्षा विचारधारा मोठी असते. फुले शाहु आंबेडकर विचार हे सर्वान पेक्षा मोठे आहेत. म्हणूनच क्रांतिकारी विचारांचे प्रेरणास्रोत महात्मा फुले आहेत. त्यांची विचारांची अंमलबजावणी व्यवस्थित झाली तर क्रांतिकारी परिवर्तन घडल्या शिवाय राहणार नाही. आज देशात जी परिस्थिती आहे.बुद्धिवान गुरु शिष्याची जयंती आणि निष्टावंत शिष्य अनुयायी यांनी गांभीर्याने विचार करण्यासाठी महापुरुषांची क्रांतिकारी विचारधारच यातुन बाहेर पडण्याचा मार्ग दाखवु शकते. महात्मा ज्योतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त सर्व मागासवर्गीय समाजाने आपआपल्या समाजाच्या संघटनेचे वैचारिक आत्मचिंतन करून परीक्षण करणे आवश्यक आहे.२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत जात धर्माच्या चौकटीत बसणारा वैचारिक मानसिक गुलामी करणाऱ्या उमेदवाराला मतदान करू नये. हीच त्यांच्या जयंतीनिमित्त सर्व बहुजन समाजा कडून अपेक्षा महात्मा ज्योतीराव फुले यांच्या क्रांतिकारी विचाराला कोटी कोटी प्रणाम आणि जयंतीनिमित्त सर्व बहुजन समाजाला हार्दिक शुभेच्छा!


सागर रामभाऊ तायडे, भांडुप,मुंबई.
९९२०४०३८५९

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here