Home महाराष्ट्र धरणगावातील समस्यांच्या पार्श्वभूमीवर धरणगाव विकास मंच ची आढावा बैठक संपन्न..

धरणगावातील समस्यांच्या पार्श्वभूमीवर धरणगाव विकास मंच ची आढावा बैठक संपन्न..

56

 

धरणगाव प्रतिनीधी – पी डी पाटील

धरणगाव : शहरातील पाणीपुरवठा, गटारी, स्ट्रीट लाईट, तसेच अन्य विविध समस्यांच्या पार्श्वभूमीवर, व आजपावेतो शहरातील विविध भागात समस्यांचे निराकरण झाल्याबाबत नागरिकांकडून जाणून घेत धरणगाव विकास मंच ची आढावा बैठक उत्साहात संपन्न झाली. बैठकीचे प्रास्ताविक राजू ओस्तवाल यांनी केले.
यावेळी शहरातील प्राणीप्रश्‍न, रस्ते, गटार, स्मशानभूमी, आरोग्य, स्ट्रीट लाईट, नाले सफाई आदींसह तलावाचे मूळ रूप आणि सौंदर्य अबाधित राखणे, मूलभूत सुविधांसह अन्य समस्या उपस्थितांनी व्यक्त केल्यात. सामजिक कार्यकर्ते राहुल जैन यांनी उपस्थितांच्या समस्यांची दखल घेत सदरील समस्यांच्या संदर्भात गुरुवार रोजी निवेदन दिले जाणार असल्याचे श्री.जैन यांनी सांगितले. तद्नंतर आपले गाव स्वच्छ, आकर्षक, आनंदी, निसर्गरम्य आणि सुंदर ठेवण्यासाठी व माझ्या गावाच्या विकासासाठी मी माझ्या वतीने काय करू शकतो याबाबत विजयकुमार शुक्ला, आकाश बिवाल, भगवान कुंभार, भरत शिरसाठ, रवींद्र महाजन, धर्मराज मोरे, गोरख देशमुख, सुधाकर विसावे, अविनाश बाविस्कर, सुधाकर मोरे, ललित मराठे, किशोर पवार, मयूर बागुल, कालिदास महाजन, संजय मराठे, योगेश येवले, गौरव चव्हाण, भूषण भागवत, अमोल हरपे आदींनी समस्यांवर आपले मनोगत व्यक्त केले. बैठकीच्या शेवटी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना ॲड. व्ही एस भोलाणे यांनी सांगितले की, धरणगाव विकास मंच च्या माध्यमातून राहुल जैन, राजू ओस्तवाल, लक्ष्मण पाटील, आबासाहेब वाघ यांच्या नेतृत्वाखाली सदरील उपक्रमास सुरूवात झाली. धरणगाव शहरातील स्थानिकांच्या समस्या लक्षात घेवून गावासाठी काय करता येईल. स्थानिक प्रशासन व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने काम करणे गरजेचे असल्याने “धरणगाव विकास मंच” ची स्थापना केली. शहरातील नागरिकांच्या मुलभूत समस्यांसाठी धरणगाव विकास मंच निष्पक्ष व निस्वार्थी सेवा भावनेने काम करणार असल्याची ग्वाही ॲड. भोलाणे यांनी दिली. याप्रसंगी सिताराम मराठे, शैलेश भाटिया, प्रफुल पवार, श्यामसुंदर फुलपगार, विजय सोनवणे, मयूर भामरे, स्वप्निल जैन, संतोष सोनवणे, कैलास महाजन, राहुल माळी, महेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण पाटील यांनी तर आभार आबासाहेब वाघ यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here