Home महाराष्ट्र 31 मार्च रोजी नागपूर विभाग ग्रंथालय संघाचे वार्षिक अधिवेशन

31 मार्च रोजी नागपूर विभाग ग्रंथालय संघाचे वार्षिक अधिवेशन

29

 

रोशन मदनकर, उपसंपादक, मो. 88886 28986

भंडारा: नागपूर विभाग ग्रंथालय संघ व भंडारा जिल्हा ग्रंथालय संघ यांचे संयुक्त विद्यमाने वार्षिक अधिवेशन उद्या दिनांक ३१ मार्च रोजी भंडारा येथे आयोजित केले आहे.अधिवेशनाचे उदघाटन भंडारा जिल्हा ग्रंथालय संघ अध्यक्ष धनंजय दलाल यांचे हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ.गजानन कोटेवार राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे माजी कार्याध्यक्ष शिवकुमार शर्मा,नागपूर विभाग अध्यक्ष अनिल बोरगमवार,कार्याध्यक्ष हरिदास टेंभुर्णे,गडचिरोली जिल्हा अध्यक्ष जगदीश म्हस्के,भंडारा जिल्हा ग्रंथालय अधिकारी खुमेंद्र बोपचे, विभागीय कार्यवाह भाऊराव पत्रे, विश्वनाथ बोदेले, चंद्रकांत पानसे आदी उपस्थित राहणार आहेत.

दुपारच्या सत्रात ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांना सेवाशर्ती तसेच ग्रंथालयांना दर्जावाढ व शासनाचे धोरण या विषयावर चर्चासत्र होणार असून अध्यक्षस्थानी जगदीश म्हस्के असतील. चर्चासत्रात वक्ते म्हणून खुमेंद्र बोपचे, शंकरराव लोहकरे, यशवंत भगत, धनराज रहांगडाले, नंदू बन्सोड सहभागी होतील.संचालन मारोती राऊत तर आभारप्रदर्शन शामराव श्यामकुंवर करतील.अधिवेशनात जास्तीत जास्त संख्येने पदाधिकारी तथा सदस्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन नागपूर विभाग प्रमुख कार्यवाह भाऊराव पत्रे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here