Home महाराष्ट्र अनुदानाची रक्कम कर्ज खात्यात जमा करणाऱ्या बँकांवर कार्यवाही करण्याची मागणी ! ...

अनुदानाची रक्कम कर्ज खात्यात जमा करणाऱ्या बँकांवर कार्यवाही करण्याची मागणी ! पीक कर्ज वाटप करतांना बँकांनी शेतकऱ्यांना त्रास दिल्यास आंदोलनाचा इशारा !

56

 

मोर्शी तालुका प्रतिनिधी :-
मोर्शी तालुक्यातील परिसरातील बँकेच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावांच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पी. एम. किसान योजनेची रक्कम, वीमा मदत, गारपिट मदत, अतिरुष्टी मदत व इतर शासकीय अनुदान जमा झाले. बँकेने बहुसंख्य शेतकऱ्यांचे खाते होल्ड करून ठेवले आहे. या अनुदानाच्या रकमा या कर्जखात्यात जमा करून घेत आहे. अगोदरच शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. तरी ही बँकेने शेतकऱ्यांच्या अनुदानित रकमा कर्ज खात्यात जमा करू नये असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मोर्शी तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांनी केले आहे.
आता नवीन सुरु होणाऱ्या हंगामा करीता शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप सुरू होणार आहे. त्याकरिता बॅंका शेतकऱ्यांकडून अनावश्‍यक कागदपत्रांची मागणी करीत आहेत, अशा तक्रारी प्राप्त होत आहेत. आस्मानी व सुलतानी संकटामुळे कृषिक्षेत्र आधीच संकटात सापडले आहे. शेतकरी बांधव अडचणीत आहेत. त्यामुळे शेती क्षेत्रासाठी शासनाने विविध कल्याणकारी निर्णय घेणे गरजेचे असतांना तसे होतांना दिसत नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. मोर्शी तालुका आधीच ड्राय झोन मध्ये असून येथील शेतकरी आधीच कोरडा दुष्काळ, ओला दुष्काळ आणि गारपिट, अवकाळी पाऊस, परतीच्या पावसामुळे संकटात सापडला असून यामुळे झालेले नुकसान लक्षात घेऊन बँक शाखाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांवर कर्ज वसुलीसाठी सक्ती करू नये, तसेच त्यांना शासनाकडून मिळणारे अनुदान कर्ज खात्यात जमा न करता त्वरित वितरण करावे, बँकेत आलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या मातृभाषेत सन्मानाने उत्तरे द्यावीत,’ जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना खरिपासाठी कर्ज देण्याची कार्यवाही मुदतीत करावी. आवश्‍यक तीच कागदपत्रे घेऊन शेतकरी बांधवांना कर्ज मिळवून द्यावे. त्यासाठी शेतकऱ्यांना संपूर्ण सहकार्य करावे. एकही शेतकरी बांधव पीककर्ज मिळण्यापासून वंचित राहता कामा नये. शेतकरी बांधवांची कुठेही अडवणूक होत असल्याचे आढळल्यास कीवा तशी तक्रार प्रपत झाल्यास त्या बँक अधिकाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यासाठी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष तथा ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील विविध बँकेत गेलेल्या शेतकऱ्यांसोबत हिंदीत बोलले जाते व असन्मानपूर्वक वागणूक दिली जाते. बँकांनी शेतकऱ्यांकडे कर्ज वसुलीसाठी तगादा लावला आहे. शासनाकडून मिळणारे नुकसान भरपाई अनुदान बँक शाखाधिकारी कर्ज खात्यात कपात करून घेतात, त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संकटांचा सामना करावा लागत असल्याचे निदर्शनास येत आहे.

चौकट :- बॅंकांनी शेतकऱ्यांना कर्ज मंजूर करण्यासाठी अनावश्‍यक कागदपत्रांची मागणी करून त्यांची अडवणूक करू नये. शेतकऱ्यांना मिळालेल्या अनुदानाची रक्कम कर्ज खात्यात जमा करू नये, कर्जासाठी आवश्‍यक कागदपत्रांची यादी जिल्हा प्रशासनाने जाहीर केली आहे. त्याव्यतिरिक्त अनावश्‍यक कागदपत्रे मागून शेतकरी बांधवांची अडवणूक केल्यास दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यासाठी तीव्र आंदोलन करू — रुपेश वाळके उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here