Home गडचिरोली नेहरू युवा केंद्र, गडचिरोली च्या वतीने नारीशक्ती फिटनेस रन स्पर्धेचे आयोजन ;...

नेहरू युवा केंद्र, गडचिरोली च्या वतीने नारीशक्ती फिटनेस रन स्पर्धेचे आयोजन ; तरुण युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

18

 

गडचिरोली :: 21 व्या शतकातील नारी ही कोणत्याही क्षेत्रात कमी नाही, राजकीय, सामाजिक, व्यावसायिक, क्रीडा क्षेत्रा सह इतरही क्षेत्रात आजच्या स्त्रिया पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून समोर जात आहेत. परिवारिक जबाबदारी सह इतर जबाबदाऱ्या महिला पार पाडत असताना अश्या परिस्थितीत त्यांचे आरोग्य सुद्धा सुदृढ रहाने अत्यन्त महत्वाचे आहे. त्याकरिता नेहरू युवा केंद्र संघटन गडचिरोली च्या वतीने, जिल्हा युवा अधिकारी अमीत पुंडे यांच्या मार्गदर्शनात, जागतीक महिला दिनाचे औचित्य साधून, नारी शक्ती अभियाना अंतर्गत “फिटनेस रन” स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 50 पेक्षा अधिक मुलींनी रनिंग स्पर्धेत उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविले.  प्रथम क्रमांक ख़ुशी एडलावार, द्वितीय गौरी चौधरी, तृतीय पल्लवी कुमरे यांनी पटकाविला. विजेत्या स्पर्धकांना टीशर्ट, कॅप आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेचे यशस्वी आयोजन नेहरू युवा केंद्र समन्वयक अनुप कोहळे, नेहरू युवा केंद्र समन्वयक पूजा नींदेकर, इशिका देठेकर, गुरुकुल अकॅडमि गडचिरोली चे संचालक पुष्कर सेलोकर, अश्विन दुर्गे, अमित सुरजागडे, सुदर्शन जाणकी, प्रज्वल बोधनकर आणि संपूर्ण गुरुकुल अकॅडमि गडचिरोली च्या समूहने मिळून सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here