Home सातारा खटाव जयदीप फाउंडेशन च्या वतीने मदत

खटाव जयदीप फाउंडेशन च्या वतीने मदत

131

 

सातारा / प्रतिनिधी नितीन राजे 9822800812

 

सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील खटाव मधील समाज कार्यात अग्रेसर असणाऱ्या खटाव येथील जयदीप फाउंडेशनच्या वतीने अपघातात अपंग झालेल्या किंवा दिव्यांग गरजू व्यक्तींना खटाव मधील जयदीप फाउंडेशनच्या वतीने कायमस्वरूपी अथवा तात्पुरत्या स्वरूपात व्हील चेअर,टॉयलेट खुर्ची,हॉस्पिटल बेड,काठी,वॉकर या साहित्याची मदत केली जाणार आहे असे सोशल मीडिया च्या माध्यमातून whats app ग्रुप वर मेसेज करण्यात आला होता
त्यास अनुसरून खटाव गावचे सामाजिक कार्यकर्ते गिरीश शिर्के यांनी अपघातात अपंग झालेले पळशी ता खटाव येथील त्यांचे मित्र आदिक शिंदे यांना वॉकर ची गरज आहे त्यांना वॉकर मिळेल का याची चौकशी जयदीप शिंदे यांच्या कडे केली असता शिंदे यांनी दुसऱ्याच दिवशी गिरीश शिर्के यांच्या मार्फत आदिक शिंदे यांना वॉकर उपलब्ध करून दिला.
जयदीप फाउंडेशन च्या या सामाजिक उपक्रमाचे खटाव पंचक्रोशीत कौतुक होत आहे.

——
*दिव्यांग व अपंग बांधवांची काही प्रमाणात आर्थिक परिस्थिती हलाखीची असते,अशा वेळी हे साहित्य घेणे त्यांना परवडत नाही
त्यामुळे जयदीप फाउंडेशन च्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे*
*जयदीप शिंदे*
जयदीप फाउंडेशन*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here