Home महाराष्ट्र कर्मयोगी प्रा.शंकर टाले अमृत महोत्सव उत्साहात साजरा

कर्मयोगी प्रा.शंकर टाले अमृत महोत्सव उत्साहात साजरा

98

गंगाखेड (प्रतिनिधी) शहरातील पूजा मंगल कार्यालय येथे प्रा. शंकर टाले यांचा अमृत महोत्सव त्यांच्या माजी विदयार्थी आणि कुटुंबियांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून संत जनाबाई शिक्षण संस्थेचे विद्यमान अध्यक्ष, माजी प्राचार्य डॉ. आत्माराम टेंगसे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. एल. एल. शिंदे, प्रा. केशव वसेकर, डॉ. फुलवाडकर, व प्रा. पोहरेकर हे होते. या प्रसंगी सरांच्या जीवनकार्य आणि व्यक्तिमत्व यावर प्रकाश टाकणारा गौरवग्रंथ ‘कर्मयोगी प्रा. शंकरराव टाले’ याचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. विविध क्षेत्रात कार्यरत असणारे सरांचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात या सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित होते. डॉ. आर. टी. बेद्रे, प्राचार्य डॉ. वसंत सातपुते, प्रा. जाधवर, प्रा. जाधव, डॉ. जगन्नाथ तुडमे, व्यंकटेश हराळे, विनया चव्हाण, आशा राठोड, अँड.संदीप पाठक, दिनेश भालेराव, डॉ. कुंदन राजूरकर अशा अनेक विद्यार्थ्यांनी आपली मनोगते या प्रसंगी व्यक्त करत प्रा. टाले सरांचे आपल्या आयुष्यात असणारे योगदान मांडत जुन्या आठवणींना उजाळा दिला. अनेक मान्यवर मंडळी या सरांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होती. यामध्ये ॲड. संतोष मुंढे, डॉ. सिद्धार्थ भालेराव, डॉ. किशन गारोळे, विजयकुमार तापडिया आणि गंगाखेड व परिसरातील राजकीय, सामाजिक, वैद्यकीय, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. तुकाराम बोबडे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय माहेश्वरी सभेचे जिल्हा उपाध्यक्ष गोपाळ मंत्री यांनी तर सूत्रसंचालन प्रा. जयश्री पछाडे व प्रा. विजय बेरळीकर यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सरांचे सर्व माजी विद्यार्थी आणि आणि प्रा. प्रवीण टाले, डॉ. प्रसाद टाले, डॉ. श्रीहरी टाले यांनी परिश्रम केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here