Home चंद्रपूर जिल्ह्यात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान यशस्वी करा-अभियानात 50 लाखा पर्यंत बक्षीस-Make the...

जिल्ह्यात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान यशस्वी करा-अभियानात 50 लाखा पर्यंत बक्षीस-Make the Sant Gadgebaba Village Swachhata Mission a success in the district

272

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपुर(दि.23ऑक्टोबर):-जिल्ह्याच्या ग्रामीण भागात स्वच्छतेची व्याप्ती वाढविण्यासाठी जिल्ह्यात 19 ऑक्टोंबर ते 30 जानेवारी या कालावधीत संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन 2023- 24 मध्ये राबविण्याचे राज्यस्तरावरुन निर्देश देण्यात आले असुन, चंद्रपुर जिल्ह्यातील गावात अभियान यशस्वी करा असे आवाहन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉनसन यांनी केले आहे.

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सर्व ग्रामीण कुटुंबापर्यंत पोहचविण्यासाठी 15 नोव्हेंबर पर्यंत ग्रामपंचायत स्तरावर समिती गठण व कृती कार्यक्रम निश्चित करण्यात येणार आहे. दिनांक 21 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर या काळात जिल्हा परिषद गट स्तरावर स्पर्धा राबविण्यात येणार असुन, या स्पर्धेअंतर्गत गावांची समिती मार्फ़त तपासणी करण्यात येणार आहे. 21 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर अखेर जिल्हा परिषद गट स्तरावर प्राथमिक तपासणी करण्यात येणार आहे. दिनांक 6 ते 21 डिसेंबर अखेर जिल्हा परिषद गट अंतिम तपासणी केली जाणार आहे. दिनांक 22 डिसेंबर ते 6 जानेवारी अखेर जिल्हास्तरावर तपासणी, दिनांक 7 ते 30 जानेवारी अखेर विभागीय स्तरावर तपासणी केली जाणार आहे.जिल्हा स्तरावर उत्कृष्ट सफ़ाई कामगारांना जिल्हा परिषद गट स्तरावर 5 हजार रुपये, जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांकास 9 हजार रुपये, द्वितीय क्रमांकास 8 हजार रुपये, तृतीय क्रमांकास 7 हजार रुपये, बक्षीस देण्यात येणार आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धे अंतर्गत ग्रामपचायतींनी जिल्हा परिषद गट स्तरावर प्रथम 60 हजार रुपये, जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांकास 6 लाख रुपये, द्वितीय क्रमांकास 4 लाख रुपये, तृतीय क्रमांकास 3 लाख रुपये, विभाग स्तरावर प्रथम क्रमांकास 12 लाख रुपये, द्वितीय क्रमांकास 9 लाख रुपये, तृतीय क्रमांकास 7 लाख रुपये, राज्यस्तरावर प्रथम क्रमांकास 50 लाख रुपये, द्वितीय क्रमांकास 35 लाख रुपये, तृतीय क्रमांकास 30 लाख रुपये, बक्षीस दिले जाणार आहे. स्व. वसंतराव नाईक पुरस्कार घनकचरा सांडपाणी व मॅलागाळ व्यवस्थापनासाठी ग्रामपंचायतीस विशेष पुरस्कार दिला जाणार असुन, जिल्हास्तरावर 50 हजार रुपये , विभागस्तरावर 75 हजार रुपये, राज्यस्तरावर 3 लाख रुपये बक्षीस देण्यात येणार आहेत. या संधीचा चंद्रपुर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉनसन व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छ्ता) नुतन सावंत यांनी केले आहे.

 

Make the Sant Gadgebaba Village Swachhata Mission a success in the district.

 

Chandrapur (Representative) (Date – 23/10/2023) -In order to increase the scope of cleanliness in the rural areas of the district, the Sant Gadgebaba Gram Swachhata Abhiyan 2023-24 has been directed to be implemented in the district from 19th October to 30th January. Vivek Johnson, Chief Executive Officer of the Council.

In order to reach Sant Gadgebaba Gram Swachhata Abhiyan to all rural families, committee formation and action program will be decided at Gram Panchayat level till November 15. During the period from November 21 to December 21, the competition will be conducted at the Zilla Parishad group level, and under this competition, the villages will be inspected through the committee. Preliminary examination will be conducted at Zilla Parishad group level from November 21 to December 5. Zilla Parishad group final examination will be conducted from 6th to 21st December. Inspection at the district level from 22nd December to 6th January, inspection at the departmental level from 7th to 30th January. At the district level, excellent cleaning workers will be awarded Rs. 7 thousand rupees will be awarded to the third place.

Under the Rashtrasant Tukdoji Maharaj Swachh Gram competition, Grampachayats have awarded 60 thousand rupees for the first place at the Zilla Parishad group level, 6 lakh rupees for the first place at the district level, 4 lakh rupees for the second place, 3 lakh rupees for the third place, 12 lakh rupees for the first place at the division level, 9 lakh rupees for the second place. , 7 lakh rupees for the third place, 50 lakh rupees for the first place at the state level, 35 lakh rupees for the second place, 30 lakh rupees for the third place. self Vasantrao Naik Award Special award will be given to village panchayats for solid waste sewage and sewage management, 50 thousand rupees will be given at the district level, 75 thousand rupees at the division level, and 3 lakh rupees at the state level. Zilla Parishad Chief Executive Officer Vivek Johnson and Deputy Chief Executive Officer (Water and Sanitation) Nutan Sawant have appealed to all Gram Panchayats in Chandrapur district to take advantage of this opportunity.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here