Home महाराष्ट्र दिव्यांग, विधवा, निराधार, लाभार्थ्यांचे मागील तीन महिन्यांचे अनुदान दिवाळीपूर्वी मिळणार प्रहार संघटनेच्या...

दिव्यांग, विधवा, निराधार, लाभार्थ्यांचे मागील तीन महिन्यांचे अनुदान दिवाळीपूर्वी मिळणार प्रहार संघटनेच्या पाठपुराव्याला यश : नागेश खांडेकर

101

सचिन सरतापे (प्रतिनिधीम्हसवड )मोबा.9075686100

म्हसवड : माण तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दिव्यांग, विधवा, निराधार लाभार्थ्यांना मिळणारे पेन्शन अनुदान मागील तीन महिन्यांपासून रखडलेले होते. प्रहार दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष ना. बच्चू कडू यांनी रखडलेल्या पेन्शन अनुदानाचा विषय सरकारकडे लावून धरला होता. बच्चू भाऊंच्या पाठपुराव्याने सातारा जिल्ह्याला अनुदान मिळालेले आहे. दिवाळीपूर्वी पुढील आठवडाभरात माण तालुक्यातील संजय गांधी योजनेच्या सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावरती दीड हजार रुपये प्रमाणे तीन महिन्यांचे साडेचार हजार रुपये जमा होतील. माण तालुका तहसील कार्यालयातील संजय गांधी योजनेमध्ये कार्यरत असणारा कर्मचारी स्टाफ अतिशय चांगले कार्य करत असून त्यांच्यामध्ये दिव्यांग बांधवांप्रती नेहमीच आदराची आणि प्रेमाची भावना असते. त्यामुळे माण तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी तहसील कार्यालय कडे विनाकारण हेलपाटे मारू नयेत असे आवाहन प्रहार दिव्यांग क्रांती संघटना माण तालुका अध्यक्ष नागेश खांडेकर यांनी केले आहे. दिव्यांग बांधवांना पुरवठा विभागाचे सहकार्य मिळत नसून दिव्यांगांच्या कामाकडे दुर्लक्ष केले जाते. पुरवठा विभागातही संजय गांधी योजनेसारखे दिव्यांगांचे काम एका हेलपाट्यात व्हायला हवे अशी यंत्रणा मा. तहसीलदार आहेर साहेब यांनी तयार करावी अशीही मागणीही नागेश खांडेकर यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here