Home महाराष्ट्र उमरखेड येथील उर्दू शाळेच्या चपराश्याने केला पत्रकारावर हल्ला ; अर्वाच्य भाषेत शिवीगाळ

उमरखेड येथील उर्दू शाळेच्या चपराश्याने केला पत्रकारावर हल्ला ; अर्वाच्य भाषेत शिवीगाळ

1115

(पत्रकार सुरक्षा कायद्या अंतर्गत कारवाईची मागणी)

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.1ऑक्टोंबर):-येथील नगर पालीकेच्या उर्दू माध्यमिक व हाजी म. अमानउल्ला जहागीरदार उच्च माध्यमिक विद्यालय उमरखेड या शाळांमध्ये काही पत्रकार यांना फोन लावून पालक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांनी बोलवले होते.

या शाळांमध्ये तांदूळ आणि मला इथले अध्यापक न विचारलं नाही ते ट्रक खाली केला किंवा नाही याची माहिती त्यांना दिली नाही आणि त्याचा तांदूळ किती स्टॉक आहे. तेही सांगितले नाही मी तुम्हाला बाईट देतो म्हणून पत्रकारांना बोलवले होते.

तेव्हा शेख इरफान, विजय कदम आणि राजेश खंदारे हे तीन पत्रकार उर्दू शाळांमध्ये गेले.तिथे गेल्यावर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांची मुलाखात घेतली.

त्यावेळी मुख्याध्यापक प्रभारी हे दोन तास हजर नव्हते आणि चपराशी सुध्दा हजर नव्हते. नगरपरिषद उर्दू शाळांमध्ये तांदूळ प्रकरण अध्यक्ष न उघड केला आहे. तिथले शिक्षक चपराशी मिळून शालेय पोषण आहार योजना जी आहे त्याच्यातला हे शिक्षक माल चोरी करुन बाहेर नेऊन विकतात असे अध्यक्ष यांचे म्हणणं आहे.त्याच वेळी उर्दू शाळेचे शिपाई बाहेरून आल्यानंतर डायरेक्ट पत्रकाराचे अंगावर लोखंडाची राड घेऊन धावत आला व शिवीगाळ केली.त्यावेळी तिथे चार शिक्षक उपस्थित होते.

म्हणाले की तू येथे कश्यासाठी येत आहे. असे बोलून पत्रकार यांच्या अंगावर येत होता.

यावेळी उमरखेड वार्ता, दैनिक अधिकारनामा चे जिल्हा प्रतिनिधी, लोकहित लाईव्ह न्युज चैनल डिजिटल न्यूज मीडिया चे पत्रकार यांना आरोपी शेख खालिद शेख महमूद जनाब अं वय 45 वर्ष याने विनाकारण हातात लोखंडाचा राड घेऊन धावत अंगावर आले.शिवीगाळ सुरू केली.आणि पत्रकाराला जीवाने मारण्याची धमकी दिली.

सविस्तर वृत्ती अशी आहे की, दि. 30 सप्टेंबर2023 रोजी दुपारी 2: 30 वाजता पत्रकार 1)शेख इरफान 2) विजय कदम 3) राजेश खंदारे हे उर्दू शाळांमध्ये भेटण्याकरिता गेले असता कोणताही कारण नसतांना पत्रकार यांनाच उर्दू शाळा च्या शिपाई विनाकारण अंगावर धावून आलते शिवीगाळ करून जीव मारण्याची धमकी दिली.व आरोपीकडून माझ्या जीवितास धोका आहे त्याच्यावर योग्य कारवाई करावी.असा जबानी रिपोर्ट पोलीस स्टेशनला नोंद करून आरोपी शेख खालिद शेख मोहम्मद यांच्या विरुध्द कलम 504, 506 नुसार गुन्हा नोंद केला आहे.

पत्रकार सुरक्षा कायदा अंतर्गत कारवाई करण्यात यावे व तत्काळ कारवाई करण्यात यावे.उमरखेड पोलीस स्टेशन ठाणेदार साहेब यांनी एफ आय आर दाखल केला. अशी माहिती पत्रकार शेख इरफान यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here