Home महाराष्ट्र ईद-ए-मिलाद निमित्त शाळकरी मुलांना जेवणाची मेजवानी

ईद-ए-मिलाद निमित्त शाळकरी मुलांना जेवणाची मेजवानी

139

सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा.9075686100

म्हसवड : कुकुडवाड, ता . माण येथे शुक्रवारी साजऱ्या झालेल्या ईद-ए-मिलाद निमित्त कुकुडवाड येथील मुस्लिम जमात तर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलांना स्नेहभोजन देण्यात आले.
मुहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस ईद-ए-मिलाद म्हणून सर्वत्र साजरा केला जातो, या दिवसाचे औचित्य साधून कुकुडवाड येथील मुस्लिम समाजातर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडी मधील विद्यार्थ्याना शनिवारी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.कुकूडवाड येथील मुस्लिम बांधव नेहमीच समाज उपयोगी सामाजिक कार्यक्रम राबवत असतात शाळकरी मुलांना भोजन दिल्याबद्दल येथील मुस्लिम बांधवाचे आभार माणण्यात आले यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्व शिक्षक व मुस्लिम समाजातील लोक उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here