Home महाराष्ट्र विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाठीचे हे शासनाचे पाऊल – डॉ अरविंद मुंगोले

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाठीचे हे शासनाचे पाऊल – डॉ अरविंद मुंगोले

65

🔸प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियावर कार्यशाळा : ने.हि.महाविद्यालयात उपक्रम

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रह्मपुरी(दि. 21 ऑगस्ट):-विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी केंद्रशासनाने ‘पी एम-उषा ‘ योजना राबविण्याचा संकल्प शासनाने केला असून यात केंद्रशासन 60 टक्के तर राज्यशासन 40 टक्के निधी महाविद्यालयांना देणार आहे.यात आपल्यालाकडे महाविद्यालयात असलेल्या पायाभूत सुविधांचा विकास आणि विद्यार्थ्यांना भरपूर सुविधा उपलब्ध करुन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हे शासनाचे योग्य पाऊल असल्याचे प्रतिपादन डॉ अरविंद मुंगोले यांनी केले.ते नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात ‘ पी एम उषा योजना’ वरील कार्यशाळेत मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ डी एच गहाणे तर प्रमुख उपस्थितीत डॉ सुभाष शेकोकर, डॉ रेखा मेश्राम, डॉ राजेंद्र डांगे उपस्थित होते. याप्रसंगी अध्यक्ष प्राचार्य डॉ डी एच गहाणेंनी या योजनेचा आपण लाभ घेऊन आपले विभाग समृध्द बनवूया आणि विद्यार्थ्यांना योग्य उच्च शिक्षण प्रदान करण्यावर भर देऊया!असे विचार मांडले.या कार्यशाळेचे आयोजन ‘आय क्यू ए सी’ द्वारे करण्यात आले.संचालन व आभार या विभागाचे प्रमुख डॉ किशोर नाकतोडेंनी केले.या कार्यशाळेला समस्त प्राध्यापक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here