Home पुणे पुण्यात आसियान ट्रेड (ASEAN Trade ) ची सुरूवात

पुण्यात आसियान ट्रेड (ASEAN Trade ) ची सुरूवात

117

✒️पुणे(पुरोगामी न्युज नेटवर्क)

पुणे(दि.21ऑगस्ट):-पुण्यातील हॉटेल शेरेटन ग्रॅंड येथे इंडियन आसियान  ट्रेड   मीट्स या परिषदेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. ही परिषद म्यानमारचे राजदूत एच.ई. मोए क्याव आंग आणि लाओसचे राजदूत एच.ई बाउंमी वॅनमनी यांच्या सहकार्याने आणि पाठिंब्यातुन संपन्न झाली. यावेळी भारत आणि आसियान देशांमधील व्यापार संबंधांना गती देण्यासाठी म्यानमारचे काउंसिल डॉ. रंगनाथन, पुष्कराज एंटरप्रायझेसचे अध्यक्ष शैलेंद्र गोस्वामी हे प्रमुखरित्या उपस्थित होते. या परिषदेला इंडियन इकॉनॉमिक ट्रेड ऑर्गनायजेशनचे जागतिक अध्यक्ष डॉ. आसिफ इक्बाल आणि अन्य विविध प्रतिनिधींचीही उपस्थिती होती. यावेळी भारत आणि आसियान यांच्यातील आपसी संबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी डॉ. सचिन मधुकर काटे यांना या सर्व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये ट्रेड कमिशनर पदी नियुक्त करण्यात आले.

भारत आणि असोसिएशन ऑफ साऊथईस्ट एशियन नेशन्स (ASEAN) यांनी आपल्या दृढ, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंधातुन तसेच पारस्पारिक करारातुन आपली बहुआयामी भागीदारी मजबूत करण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. आसियान- इंडिया फ्री ट्रेड एग्रीमेन्ट (एआयएफटीए) सारख्या करारांमुळे त्यांच्या दोन्ही बाजू बळकट झाल्या असुन व्यापार आणि गुंतवणूकीद्वारे परस्पर संबंध वाढवण्यासाठी ते दृढ आणि वचनबद्ध आहेत. हे करार व्यापारातील अडथळे आणि शुल्क प्रभावीपणे कमी करतात, तसेच वाणिज्य क्षेत्रातील आणि गुंतवणूकीत वाढीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करतात. सीमापार व्यापारासाठी आणि कनेक्टिव्हिटी अधिक गतिमान करण्यासाठी, भारत-म्यानमार-थायलंड त्रिपक्षीय महामार्ग आणि कलादान मल्टीमॉडल ट्रान्झिट ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट यासारखे दूरदर्शी उपक्रम प्रत्यक्षात येत आहेत. एकात्रितरित्या होणार्या आर्थिक सबलीकरणाच्या हेतूवर याद्वारे भर दिला जात आहे.

द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याच्या या वचन बद्धतेसाठी म्यानमारचे राजदूत मोए क्याव आंग आणि लाओस चे राजदूत बाउंमी वॅनमनी यांनी या भारत आसियान ट्रेड समिटचे उत्साहात स्वागत केले. यावेळी पुण्यातील इंडिया आसियान ट्रेड कौन्सिलच्या कार्यालयाचे देखील शुभ उद्घाटन झाले. म्यानमारचे काउंसिल डॉ. रंगनाथन यांच्या उपस्थितीने या उद्घाटन समारंभाची शोभा आणखीणच वाढवली होती. नव्याने स्थापन झालेले हे कार्यालय व्यापारी गतिविधी सुलभ करण्यासाठी, पुणे आणि महाराष्ट्रातील भारतीय निर्यातदार आणि कंपन्यांना बहुमोल सहाय्य प्रदान करण्यासाठी आणि या व्यापारात आपली महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्यासाठी तयार आहे, कारण ते आसियान राष्ट्रांमध्ये प्रवेश करू इच्छितात. आसियान (ASEAN) चे शिष्टमंडळ सप्टेंबरमध्ये कंबोडियाला, त्यानंतर ऑक्टोबरमध्ये सिंगापूरच्या महत्त्वपूर्ण भेटीसाठी सज्ज झाल्यामुळे पुढे काही आशादायी संभावना व्यक्त केल्या जात आहेत. याच बरोबर मलेशियातील एक बहु क्षेत्रीय शिष्टमंडळ नोव्हेंबर मध्ये पुण्याला उपस्थित राहून विविध क्षेत्रांमध्ये परस्परसंवाद वाढवण्यासाठी वचनबद्ध आहे.

लाओस आगामी वर्षासाठी आसियान (ASEAN) अध्यक्ष म्हणून कार्यभार हाती घेण्यास तयार आहे, जे नेतृत्वाच्या नवीन टप्प्याचे संकेत असुन सोबतच, इंडोनेशिया देखील आसियान अध्यक्ष म्हणून आपली भूमिका पुढे चालू ठेवेल आणि संबंधित क्षेत्रांच्या प्रगतीला सहयोग करून सहकार्य भावना आणि एकतेचा संदेश देईल.
एच.ई बाउंमी वॅनमनी लाओसचे भारतातील राजदूत यावेळी म्हणाले की, “मला विश्वास आहे की पुणे या सुंदर शहरात होणाऱ्या भारत आसियान ट्रेड कौन्सिल” परिषदेमुळे लाओ आणि भारताचे व्यापार संबंध आणि सहकार्य मजबूत होण्यात मदत होईल. नजीकच्या भविष्यात आपण एक मोठ्या स्तरावर पोहचू, विशेषतः, आपल्या दोन राष्ट्रांतील लोकांना जवळ आणण्याचा आणि जोडण्याचा मार्ग मोकळा करण्याच्या या कार्यासाठी मला निमंत्रित केल्याबद्दल मी मनःपूर्वक आभार व्यक्त करू इच्छितो आणि ही परिषद यशस्वी व्हावी यासाठी शुभेच्छा देतो.”

म्यानमारचे राजदूत एच.ई. मोए क्याव आंग यावेळी म्हणाले, “वर्ष २०१८ हे म्यानमार आणि भारत यांच्यातील राजनैतिक संबंधांच्या स्थापनेचे ७० वे वर्धापन वर्ष म्हणुन साजरे केले गेले. दोन्ही देशांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध आणि सांस्कृतिक संबंधांचा दीर्घ इतिहास तर आहेच पण याचबरोबर मजबूत आर्थिक आणि व्यावसायिक संबंध देखील आहेत. म्यानमार-भारत संबंध हे सामान ऐतिहासिक, वांशिक, सांस्कृतिक आणि धार्मिक संबंधांवर आधारित आहेत, असे म्हटले जाते.

म्यानमारचे काउंसिल रंगनाथन यावेळी म्हणाले की, “भारत आणि म्यानमार यांनी दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्र (आसियान) संघटनेच्या चौकटीत आपले परस्पर संबंध वाढवल्याने त्यांच्या राजनैतिक संबंधांमध्ये एक नवीन अध्याय सुरू झाला आहे. भारत आणि म्यानमार मधील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक बंधामुळे या भागीदारीस भक्कम पाया मिळाला आहे. त्यांच्या समृद्ध वारश्यास अधोरेखित करून, दोन्ही देश आर्थिक सहकार्याला चालना देण्यास तयार आहेत, ज्यामध्ये व्यापार आणि गुंतवणूक ही प्रमुख धोरणे आहेत. दोन्ही राष्ट्रांनी व्यापारातील वाढीची मोठी क्षमता ओळखली असुन ते त्या दिशेने काम करत आहेत. ज्यात पारस्परिक फायद्यांची जास्तीत जास्त वाढ करण्याचे योजना समाविष्ट आहे.”

इंडियन इकॉनॉमिक ट्रेड ऑर्गनायजेशनचे अध्यक्ष डॉ. आसिफ इक्बाल यावेळी म्हणाले, ” ६४० दशलक्षाहून अधिक रहिवाशांसह, आसियान एकूण जगाच्या लोकसंख्येच्या ८.७% लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करते. भू-राजकीय क्षेत्रातील संबंध मजबूत झाल्यामुळे भारत-आसियान आर्थिक संबंधांना चालना मिळाली आहे,२०१९-२० मध्ये ८६.९ अब्ज डॉलर्सच्या द्विपक्षीय व्यापारामुळे आसियान आता भारताचा चौथा सर्वात मोठा व्यापारी भागीदार झाला आहे. भारताचे ‘ऍक्ट ईस्ट’ धोरण हे त्याच्या इंडो-पॅसिफिक व्हिजन चा मुख्य सिद्धांत आहे. भारताकडे मुक्त व्यापार करार (FTA) देखील आहे. ” वन व्हिजन, वन आयडेंटीटी, वन कम्युनिटी ” हे ब्रीदवाक्य असलेला आसियान ASEAN हा जगातील सर्वात अनोख्या सांस्कृतिक दृष्ट्या वैविध्यपूर्ण प्रदेशांपैकी एक आहे, आणि आम्ही त्याचे सदस्यत्व घेणार्‍या सर्व देशांना सहकार्यासाठी आमचे दरवाजे उघडले आहेत.

ट्रेड कमिशनर डॉ. सचिन मधुकर काटे यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, “पुण्यातील ट्रेड कमिशनर या नात्याने मला पुण्यातील सर्व इंडस्ट्रीज मिळतील, कारण हे शहर तरुण लोकसंख्येचे आणि मोठ्या उद्योजकांचे शहर आहे. येथे आसियान देशांमधील व्यवसायांना मोठा वाव आहे आणि आमचे कार्यालय आसियान प्रदेशात संधी शोधत असलेल्या लोकांना मदत करेल, सोबतच व्यवसाय वाढीला आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देऊन येथे शिक्षित आणि अनुकूल व्यावसायिक वातावरण निर्माण करू, यासाठी आम्ही विविध उपक्रमांचे आयोजन करण्यासाठी प्रयत्नशिल राहू. आम्ही भारत आणि आसियान मधील संबंध मजबूत करण्यासाठी, अधिक दृढतेसाठी, या राष्ट्रांमधिल पारस्पारिक व्यवसाय वाढ आणि गुंतवणूकीस प्रोत्साहन देण्यासाठी कार्य करू.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here