Home महाराष्ट्र सद् भावना दिनाची शपथ घेऊन भारताचे माजी प्रधानमंत्री राजीव गांधी जयंती सम्पन्न

सद् भावना दिनाची शपथ घेऊन भारताचे माजी प्रधानमंत्री राजीव गांधी जयंती सम्पन्न

50

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रह्मपुरी(दि. 21 ऑगस्ट):-येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती सद् भावना दिवस म्हणून साजरी करण्यात आली.सर्वप्रथम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी एच गहाणेंच्या हस्ते प्रतिमेला माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यानंतर डॉ सुभाष शेकोकर, डॉ राजेंद्र डांगे, डॉ रेखा मेश्राम, डॉ युवराज मेश्राम,अधीक्षक संगीता ठाकरे, डॉ आशिष साखरकर,रोशन डांगे,जयंत महाजन यांनी स्व.राजीव गांधीच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली.सर्वांनी याप्रसंगी सद् भावनेची शपथ घेतली.यशस्वीतेसाठी समिती प्रभारी डॉ कुलजित शर्मा, डॉ धनराज खानोरकर, डॉ युवराज मेश्राम प्रा धिरज आतला ,रामटेके,गुरनुले यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here