Home पर्यावरण संत्रा गळतीचे सर्वेक्षण करून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत करा

संत्रा गळतीचे सर्वेक्षण करून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत करा

133

🔹जिल्ह्यातील संत्रा गळतीवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी !

🔸आमदार देवेंद्र भुयार यांनी दिले सर्वेक्षण करण्याचे निर्देश !

✒️मोर्शी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मोर्शी(दि.18ऑगस्ट):-विदर्भातली संत्रा बागांवर हवामानातील बदलामुळे होणाऱ्या संत्रा गळतीमुळे लाखो संत्रा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. या गळतीवर प्रतिबंध करण्याकरिता कृषी विभागाने व कृषी विद्यापीठने तातडीने उपाय योजना करून संत्रा गळतीचे सर्वेक्षण करून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी आमदार देवेंद्र भुयार यांनी केली आहे.

विविध संकटांमुळे आधीच संत्रा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. संत्रावरील विवीध रोगांमुळे संत्रा बाग वाळत असल्यामुळे हजारो हेक्टर वरील संत्रा झाडांवर शेतकऱ्यांनी कुऱ्हाड चालवली परंतू मदत मात्र मिळालीच नाही. त्यात आता राहिलेल्या संत्रा पिकाला गळती लागली आहे. मात्र सरकारच्या कोणत्याही अधिकाऱ्याने याबाबत लक्ष दिलं नसल्यानं शेतकरी अधिकच अडचणीत सापडला आहे.

विदर्भात संत्र्यांच्या बागांची मोठी गळती सुरू असून शेतकरी चिंतेत आले आहे. संत्र्यांच्या लागवडीसाठी लागलेला खर्चही निघणार नसल्याने संत्रा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. सध्या शेतकरी रोज शेतात आल्यानंतर त्यांना गळालेला संत्रा उचलण्याशिवाय पर्याय नाही. गळालेला संत्राचं सर्वेक्षण करायला अधिकारी येईल थोडी फार मदत होइल या भोबळ्या आशेने शेतकरी सध्या अधिकाऱ्यांची वाट पाहत आहेत. मात्र, कधी कोणताही अधिकारी शेताकडे फिरकतच नाही. कर्ज काढुन त्यांनी संत्रा बागांची मशागत केली. पण त्याच संत्राचा रस आता जमिनीत झिरपत आहे.

विदर्भाची संत्री ही खायला आंबट गोड आहे. त्यामुळे त्याची मागणीही साता समुद्रापार आहे. पण याचा फायदा मात्र, शेतकऱ्यांना होत नाही. अमरावतीच्या वरुड, मोर्शी, चांदुर बाजार, अचलपूर, तिवसा भागात संत्रा पिकाचं मोठं उत्पादन होत. मात्र, यंदा भाव नाही त्यात संत्रा गळती वाढल्याने आता झाडावर संत्रा राहतील की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

संत्रा विदर्भातील महत्वाचे फळ असून अमरावती जिल्ह्यामध्ये 50 हजार हेक्टर जमीनीवर संत्रा लागवड आहे. यावर्षी मृग बहार अतिशय तुरळक प्रमाणात आला आहे. मात्र, आंबिया बहार मोठ्या प्रमाणात आला असून शेतकऱ्याच्या उत्पादनांची भिस्त या आंबिया बहारावर आहे. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय दिलासा देण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांनी मोर्शी-वरुड तालुक्यांतील संत्राच्या फळ गळतीचे सर्वेक्षण करण्याची मागणी केली आहे. संत्रा हे नगदी पिक असून शेतकऱ्यांना हाताशी आलेल्या पिकाची मोठ्या प्रमाणावर गळती होताना पाहावी लागत आहे. कृषी अधिकारी संभ्रमात असल्याने त्यांच्याकडूनही शेतकऱ्यांना कोणत्याच प्रकारचे मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळे हाता तोंडाशी आलेल्या कोट्यावधी रुपयांच्या संत्रा उत्पादनाला मुकावे लागणार या विवंचनेत शेतकरी अडकलेला आहे.
शेतकऱ्यांचे हे नुकसान टाळण्यासाठी कृषी विभाग, कृषी विद्यापीठ व संत्रा संशोधन केंद्र नागपूर यांनी तातडीने पाहणी करून उपाय योजना करावी, शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करावे.

संत्रा उत्पादक शेतकरी निसर्गाचे अनियमीततेमुळे पचंड आर्थीक संकटात सापडलेला असतांना संत्रा फळ गळतीमुळे उद्भवलेल्या आर्थीक संकटातुन बाहेर काढण्यासाठी शासनाकडून आर्थीक मदत करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी प्रचंड प्रमाणात संत्रा फळ पिकाच्या झालेल्या संत्रा गळतीचे तात्काळ सर्वेक्षण करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना निर्देश देऊन झालेल्या नुकसानीचा अहवाल शासनास लवकरात लवकर अवगत करुन शेतक-यांचे झालेले आर्थीक नुकसान भरपाईसाठी शासनाकडे आर्थीक अनुदान नुकसान भरपाईचा मागणी प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचे निर्देश दिले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here