Home महाराष्ट्र फलटण येथील मोफत आरोग्य शिबीरात 530 रुग्णांची तपासणी

फलटण येथील मोफत आरोग्य शिबीरात 530 रुग्णांची तपासणी

75

✒️प्रतिनिधी बारामती(अशोक कांबळे)

फलटण(दि.6ऑगस्ट):- संत निरंकारी मिशन फलटण शाखेच्या वतीने आयोजित केलेल्या सर्व रोग निदान मोफत आरोग्य शिबीरात 530 रुग्णांची तपासणी करण्यात आल्याची माहिती सातारा झोनचे प्रभारी नंदकुमार झांबरे यांनी सांगितली.सदर शिबीराचे आयोजन हनुमान नगर येथील सत्संग भवनात सकाळी 9 ते 5 यावेळेत करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन डॉ. पुरूषोत्तम अरोरा (प्रसिद्ध ह्रदय विकार तज्ञ, बेंगलोर) यांच्या हस्ते कर करण्यात आले.

या शिबिरासाठी डॉ. पुरूषोत्तम अरोरा (प्रसिध्द हृदय विकार तज्ञ बंगरुळ, कर्नाटक), डॉ.विजयकुमार तावरे (मुंबई), डॉ. अंकिता केणी (जे जे रुग्णालय मुंबई), डॉ. तुकाराम खोत (गारगुटी कोल्हापूर), इत्यादि अनुभवी डॉक्टरां बरोबर आणखी पाच ते सहा सहकारी डॉक्टरांची टीम उपस्थित होती.

हे शिबीर सर्वांसाठी मोफत असल्याने फलटणसह परिसरातील 530 गरजू रुग्णांनी लाभ घेतला. शिबिरामध्ये हृदय विकारासह ब्लड प्रेशर, शुगरसह इतर आजारांची मोफत तपासणी करून त्यावर मोफत औषधे देण्यात आली असल्याचे श्री. झांबरे यांनी सांगितले.

सदर शिबीर यशस्वी पणे पार पाडण्यासाठी बारामती क्षेत्राचे क्षेत्रीय संचालक किशोर माने यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण शाखेचे मुखी अशोक लामकाने, संचालक सोपन मांढरे यांच्यासह सेवादल, सेवादल भगिनी यांनी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here