Home Breaking News उमरखेड पोलिसांनी घरपोडी चोरी करणारे टोळीला 48 तासात केले अटक

उमरखेड पोलिसांनी घरपोडी चोरी करणारे टोळीला 48 तासात केले अटक

105

🔺100 टक्के मुद्देमाल जप्त उमरखेड पोलिसांची कामगिरी

✒️सिद्धार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड (दि. 2 ऑगस्ट):-यवतमाळ जिल्ह्यामध्ये चोरी जबरी चोरी घरफोडी यासारखे कुण्य होऊ नये म्हणून त्याच प्रतिबंध करून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे करिता पोलीस ठाण्यात अधिकारी व तपास पथक यांनी हा आपले पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रतिबंधात्मक कारवाई करून गुन्हेगारांना जेलबंद करून गुन्हे उघडकीस आणावे असा आदेश पोलीस अधीक्षक साहेब यवतमाळ यांनी दिलेला आहे.

उमरखेड पोलीस स्टेशन अपराध क्र.478/2023 भा. द. वि. कलम 457, 380, 461 हा दि.30 जुलै 2023 रोजी दाखल झाला होता. सदरील पुण्यामध्ये वेगवेगळ्या कंपनीचे 13 मोबाईल किंमत 1 लाख 57 हजार पाचशे रुपये व रोख 90000 रुपये चा मध्यमान चोरीस गेला होता सदर गुन्ह्याचा योग्य प्रकारे तपास करून सदरील गुन्हा उघडकीस आणावा याबाबत श्री पवन बनसोड पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री पियुष जगताप अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड यांनी आदेश दिले होते.

त्यानुसार वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री शंकर पांचाळ साहेब यांनी तात्काळ गुन्हा उघडकीस आणणे कामे पो.उप. नि अमोल राठोड साहेब, नपोशी कैलास नेवकर व संदीप ठाकूर, चालक नापोशी समीर यांचे पथक गठित करून सदर गुन्हाबाबतची गोपनीय माहिती काढून तांत्रिक तपास करून गोपनीय माहितीची पडताळणी केली असता सदरील गुन्हा हा आरोपी 1) गंगाधर रामदार आसोले वय 20 वर्ष, विशाल अच्युत जाधव वय 21वर्ष हे दोघेही राहणार काळेश्वर तालुका हदगाव जिल्हा नांदेड यांनी चोरी केल्याची खात्री झाल्याने सदर आरोपी यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कौशल्य पूर्व तपास केला असता सदरील गुन्ह्याची आरोपी यांनी कबुली दिली आहे.

सदर गुन्ह्यातील चोरून नेलेले 13 मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल ही जप्त करण्यात आली आहे.वरील कारवाईमुळे उमरखेड येथे व्यापारी यांनी पोलिसांचे कौतुक करून आभार व्यक्त केले आहे.सदर आरोपींना मा. न्यायालयात हजर करून त्यांचे पोलीस कस्टडी घेतली आहे.सदर कारवाईत सायबर सेल यवतमाळ यांनी देखील महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे.सदर गुन्ह्याच्या पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश सरदार पोलीस ठाणे उमरखेड हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here