Home महाराष्ट्र राहत क्लीनिक तर्फे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

राहत क्लीनिक तर्फे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

52

(73 रुग्णांनी घेतला शिबिराचा लाभ)

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995469

उमरखेड(दि. 6 जुलै):-सामाजिक संघटना जमाते इस्लामी हिंद मार्फत चालविण्यात येणाऱ्या राहत बहुउद्देशिय संस्था अंतर्गत राहत क्लीनिक व आयकॉन हॉस्पीटल पुसद यांच्या संयुक्त विद्यमानाने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन राहत क्लीनिक येथे संपन्न झाले.

यात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ .गजानन मंडमवार,आरिफ अबरार, काझी जहीरोद्दीन, अ . रऊफ नदवी,शाहीद नजर आदी मान्यवर उपस्थित होते .या शिबीराचा चा लाभ 73 रुग्णांनी घेतला .
डॉ. सुदर्शन ठाकरे,डॉ आदित्य सौद न कर , डॉ राहुल राठोड डॉ.मोहसीन अहेमद, डॉ. हिना सालेहा, डॉ .आशिष चव्हाण आदींनी रुग्ण तपासणी चे कार्य केली.

शिबीरासाठी राहात क्लीनिक चे संयोजक आसिफ अन्सारी, आयकॉन हॉस्पीटल चे डॉ राहुल राठोड,आरेफा नसीर, फरहत जहा,नगमा शिरीन,शाहीन कासीम अली , नाजेमा हमीद खान या सह कामरान खान , सोहल शेख , इफ्कत सैय्यद , वैशाली सिस्टर तसेच राहत क्लीनिक स्टाफ ने परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here