Home यवतमाळ बाबाराव सदाशिव कदम (थोटे) यांचा संघर्षमय प्रेरणादायी प्रवास…!

बाबाराव सदाशिव कदम (थोटे) यांचा संघर्षमय प्रेरणादायी प्रवास…!

79

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ) मो.9823995466

उमरखेड (दि. 31 मे) जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे.
निराधार आभाळाचा तोच भार आहे.!!धॄ!!
बाळ सोडून ते दिघले कुन्ति जळांत
तरी राधिकेच्या घरी ते वाढले सुखात.
कर्णराज म्हणूनी त्याचे नांव अमर आहे.!!१!!
(या अभंगाला अनुसरून श्री बाबाराव कदम यांची संघर्षमय वाटचालीचा लेखाजोगा मांडला आहे.)
स्व.दरूबाई सदाशिव कदम (थोटे) व स्व. सदाशिव तुकाराम कदम (थोटे) रा . चालगणी ता . उमरखेड येथील उभयतांच्या पोटी 01/07/ 1966 रोजी बाबाराव या सुपुत्रचा जन्म झाला. व बाबाराव कदम हे दोन वर्षाचे असताना आईचे छत्र हरवले. मामेकुळ श्री .बळीराम नरोजी वानखेडे पाटील परिवार साखरा आईची आई स्व. गिताबाई नरोजी वानखेडे या मातेने त्यांचा कृष्णा सारखा सांभाळ केला.त्यामुळे गिताबाई कर्माची माता जरी नसली तरी धर्माची माता झाली. त्यामुळे तिचे अनंत उपकार बाबाराव कदम यांच्यावर झाले. त्यावेळेस शिक्षण फक्त चौथा वर्ग पास झाले. व सन 1979 वडिलांचे छत्र हरवले व बाबाराव कदम हे पूर्णपणे पोरके झाले. साखरा गावात भेटेल ते काम धंदा मजुरी लोकांकडे सालदारपणा करून आपली उपजीविका करत होते. पाहिजे ते सहकार्य कुणाकडून मिळत नव्हते.

जिकडे पहावे तिकडे अठरा विश्वदारिद्र्य दारिद्र्य दिसत होते. कोणाच्या पंखाखाली आश्रय घ्यावा हे काही सुचत नव्हते. विसाव्या वर्षात प्रवेश केला.पाहुणे मंडळी लग्नाचा विचार करू लागली. पण वडिलोपार्जित जमीन फक्त नावावर साठगुंठे होती. तेवढ्यातच बिटरगाव (खुर्द) ता.उमरखेड येथील स्व.भाऊराव टोपाची नरवाडे यांच्या कन्येशी शांताबाई सोबत 28/05/ 1986 रोजी विवाह झाला. नव्या संसाराला सुरुवात झाली. कोणाचाही आधार नाही एकटा चलो रे…! एकटा चलो रे…! लग्न झाल्यामुळे कळत असल्यामुळे सर्वजणाने चालगणी येथे जाण्याचा सल्ला दिला. व 1987 साली चालगणी येथे वास्तव्य केले. परंतु एका वर्षात तेथून स्थलांतर नांदेड येथे केले. त्या ठिकाणी गोपाळचावडी येथे किराणा दुकान टाकून उपजीविका करत असे. तेवढ्यातच थोरला मुलगा अमोल आजारी पडला व किराणा दुकानाची पुंजी संपली त्यामुळे 1992 ला दुकान बंद केले. पण मुलगा सावरला मग काय करायचे…? तर नांदेड या ठिकाणी बिगारी काम हमाली भेटेल ते काम करायचे पण या कामाला साथ धर्मपत्नी शांताबाईची होती. संसाराचा गाडा हाकत होते. पाहता पाहता तीन अपत्यांना जन्म दिला.जबाबदाऱ्या वाढत होत्या कुटुंबाचा खर्च वाढत होता. पण श्रमकेल्याशिवाय पर्याय नव्हता श्रम करत होते . पण नांदेड वरून पुन्हा स्थलांतर उमरखेड येथे 1995 ला झाले.

उमरखेड मध्ये एका किराणा दुकानात नोकरी स्वीकारली किराणा दुकानदार म्हणजे गांधी चौकातील खडकपुरा येथील मकसूद किराणा
किराणा मालक कादरभाई माझे सर्वेसर्वा गॉडफादर असं म्हणायला हरकत नाही. त्या माणसात मला देव पाहायला मिळाला. व मी देवाचा अनुयायी झालो. तू माझा गुरु देव सखा मित्र कुटुंबप्रमुख मी कोणतीही उपमा दिली तर कमीच आहे. कारण त्या व्यक्तीने माणसाचे रूपमला दिले व लोकमला माणूस म्हणून ओळखू लागले. पन्नास रुपये महिना भरून मला त्यांनी पाटील नगर , उमरखेड येथे प्लॉट घेऊन दिला. त्याच ठिकाणी पाटीचे पार्टिशन करून अनेक दिवस उपजीविका केली. व सन 2000 पासून प्लॉटिंग व्यवसायाकडे वळन घेतले त्या व्यवसायात मला दोन पैसे मिळत होते.माझ्या संसाराची जडणघडण हळूहळू सुधारत होती. सन 2012 पासून मित्रमंडळी इंजिनियर श्री.सतिश पत्रे साहेब यांचे सहकार्य लाभले . यांचे सारखे उमरखेड मधील जिरेमाळी व सर्व समाजाचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे . व प्लॉटिंग व्यवसायात खरेदी विक्रीच्या सुंदर प्रवासात झेप घेतली व त्यांच्या अंगी प्रामाणिकपणा ईमानदारी नेकपणा सचोटी जिद्द हे अंगी गुण होते. त्या गुणाच्या भरोशावर त्यांचा इथपर्यंत प्रवास चांगला झाला. पण ब्राह्मण समाजाच्या ,उमरखेड येथील मधुकर पांडे काकांनी गुरुमंत्र दिला. तुझा व्यवसाय चांगला आहे. एक दिवस तू खूप मोठा होणार तू चार चाकी गाडीने फिरणार पण त्यावेळी तुझे पाय जमिनीवर असायला पाहिजेत.
बाबाराव कदम यांचे पाय जमिनीवरच असणार मधुकर पांडे काकांनी एक दंडक दिला त्याचे पालन मी आजही करतो विधवा स्त्रीयाने , स्वातंत्र्यसैनिकाने जर प्लॉट खरेदी विक्री केला. तर त्यांच्या कडून मिळणारे मानधन घेत नाही . त्यांच्यासाठी विनामुल्य सेवा करतो. ते मी पाहत आहोत कारण या चालू जगात पैसा कोणाला नको आहे. आज तर या जगात मृत पावलेल्या माणसाच्या डोक्यावरचे लोणी खायला लोक तयार आहेत तर पैसा कोणाला प्यारा नाही.लहान बाळ सुद्धा एक-दोन रुपये स्वीकारत नाही दहा,विस, पन्नास रूपये दिसले की हात लांबवते ही

एवढी पैशात ताकत आहे.
पण हे बहाणा सारे करत करत समाज हित सुद्धा जोपासत असतात. त्यांच्यामध्ये खूप धार्मिकता आहे. कोणत्याही स्वरूपात घरी आलेला (अतिथी देवो भव ) व्यक्ती हा आपल्या दारातून नाराज होऊन गेला.नाही पाहिजे असा त्यांचा हेतू आहे. ते दत्तजयंती ,शिवजयंती, भीमजयंती , मराठा क्रांती भवन , किंवा अन्य कोणताही धार्मिक / सामाजिक / शैक्षणिक कार्यक्रम असो ते जमेल तेवढे सहकार्य करण्याचा प्रयत्न करतात त्यांनी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चालगणी येथे स्व .दरुबाई सदाशिव कदम (थोटे )यांच्या स्मृती प्रित्यर्थ सौ . शांताबाई बाबाराव कदम ( थोटे ) यांच्या तर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी स्टेज ( व्यासपीठ ) उभारून दिला. त्यानंतर स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर इंग्लिश मेडियम चुरमुरा रोड , उमरखेड येथे शाळा उभी आहे. स्व .दरूबाई सदाशिव कदम (थोटे ) यांच्या स्मृती प्रित्यर्थ सौ . शांताबाई बाबाराव कदम (थोटे) यांच्या तर्फे एका वर्ग खोलीचा संपुर्ण बांधकाम खर्च दिला रंग-लक्ष्मी नगर येथे त्यांच्या संकल्पनेतुन व त्यांच्या सहकार्याच्या मदतीने एक सार्वजनिक वाचनालय उभे केले. अशी छोटी मोठी मदत ते नेहमीच करत असतात एक सांगायचे म्हणजे सेवाभावी वृत्ती आहे. सेवाभावी वृत्ती असून ती आपल्या संसारात पूर्णपणे समाधानी आहेत. त्यांना एकुण तीन अपत्य आहेत .अमोल कदम हा (एम .ए. ) झाला. तर सुनिल . कदम कॉम्प्युटर इंजिनियर झाला. तर लाडकी सुकन्या प्रणिता कदम ही पॉलिटेक्निक होऊन बी. कॉम झाली.ती सध्या स्पर्धा परीक्षांची तयारी करते दोन मुलांचे विवाह झाले तर मुलीचा विवाह करणे बाकी आहे.

आज कुटुंबात सात एकर जमीन आहे.
उमरखेड यशवंत मत्ते नगर , गोकुळ नगर येथे शिव निवास बंगला आहे.
या परिवारात दोन मुलं आणि दोन सुनबाई सुद्धा एक नात (लावण्या कदम) नातु ( ऋषिकेश कदम )असा हसत खेळत दिसणारा परिवार मला मुलाखतीच्या दरम्यान खूप आवडला. एक बाबाराव सदाशिव कदम (थोटे ) यांच्या चेहऱ्यावर जर पाहिले तर दिलखुलास व्यक्तिमत्व आहे. सर्वांना सोबत घेऊन चालणारे हसत हसत बोलणारे कोणत्याही व्यक्तीने किती भार टाकला तर सहज उचलणारे म्हणजे श्री बाबाराव सदाशिव कदम (थोटे ) .
माझ्या तरी मते बाबाराव कदम (थोटे) अवलिया व्यक्तिमत्व आहे. असे म्हणावयास काही हरकत नाही.

शब्दांकन:- श्री दिगंबर चंपतराव माने (शिक्षक)
भगवती देवी विद्यालय, देवसरी उमरखेड यवतमाळ.
9404412886.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here