



✒️सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ) मो.9823995466
उमरखेड :- (दि. 1 जून) पावसाळा येऊ घातलेला असल्याने, मान्सुनपूर्वी स्वच्छता, आरोग्य व पर्यावरणच्या अनुषंगाने शहरात तुंबलेल्या नाल्या साफ करणे, शहरात जागोजागी पडलेले कचऱ्याचे ढीग साफ करणे ,प्लास्टिक पिशव्या व इतर प्लास्टिकच्या बॉटल्स वगैरे हटवून त्याची वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावणे ,शहरात डासांची पुनरुत्पत्ती वातावरण बदलामुळे सुरू झालेली आहे.
येत्या काळात ओल्या वातावरणात डास अधिक प्रमाणात उत्पन्न होतील. त्यामुळे डेंगू सारखे आजार बळावण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून फागिंगं मशीन द्वारे फवारणी करण्यास सुरुवात करावी.
आदी कामे आपल्या कर्मचाऱ्यांमार्फत करून घेऊन नागरीकांचे आरोग्य तसेच पर्यावरण अबाधित राहील याची खबरदारी घेवून उपाय योजना करावी.
अशा मागणी चे पत्र :जमात ए इस्लामी हिंद ह्या सामाजिक संघटने तर्फे न.प. मुख्याधिकारी यांना देण्यात आले.
निवेदन देतांना राहत रोशन अन्सारी, शोएब खान, मो. अबुजर, फिरोज अन्सारी, मो. नजीब आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


