Home महाराष्ट्र कराड तालुक्यातील निर्भीड समाजसेवक -संपादक विश्वास मोहिते

कराड तालुक्यातील निर्भीड समाजसेवक -संपादक विश्वास मोहिते

55

 

पाडळी( केसे) तालुका कराड गावचे सुपुत्र आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष,तिरंगा रक्षक आणि दैनिक क्रांतिकारी जयभीम या वृत्तपत्राचे मुख्य संपादक विश्वास मोहिते यांचा 42 वा वाढदिवस साधेपणाने 2 जून 2023 रोजी साजरा होत आहे त्यानिमित्त……..

पाजळी (केसे) तालुका कराड गावचे सुपुत्र विश्वास मोहिते यांचा वाढदिवस दोन जून रोजी पाडळी (केसे) तालुका कराड या त्यांच्या राहत्या गावी विविध सामाजिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. या सप्ताहामध्ये विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम ही राबवणार असल्याची माहिती संयोजन समितीच्या वतीने देण्यात आले आहे.

विश्वास मोहिते यांनी आपली पत्रकारिता सन 2003 साली सातारा जिल्ह्यातील स्थानिक वर्तमानपत्रातून सुरुवात केली. यापूर्वी विद्यापीठांची पत्रकारितेची पदवी संपादन केली. पत्रकारिता करीत असताना त्यांनी सामाजिक कार्याची ही कास धरली. विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून आणि संस्थांच्या माध्यमातून त्यांनी अविरत सामाजिक कार्य सुरू ठेवले आहे. त्यांच्या 2003 ते 2020 या कालावधीतील सामाजिक कार्याबद्दल विविध सामाजिक संघटनांनी विविध पक्षांनी त्यांचा आदर्श पत्रकार,आदर्श समाजसेवक, समाज रत्न अशा विविध पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे. स्वताचे विचारपीठ असावे म्हणून 2009 साली तिरंगा रक्षक नावाचे वर्तमानपत्र सुरू केले. त्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून दलित,पद दलित,वंचित आणि अन्यायग्रस्तांना न्याय देण्याचे काम निर्भीडपणे निपक्षपाती पणे सातत्याने केले आहे. त्यामुळे ती त्यांचे तिरंगा रक्षक हे पत्र सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचे वृत्तपत्र होऊन गेले आहे.
लॉकडाऊन काळामध्ये त्यांनी गरीब,गरजू आणि लॉकडाऊनमुळे ज्यांच्या वरती उपासमारीची वेळ आली आहे अशा लोकांना संस्थेच्या माध्यमातून आणि दानशूर लोकांच्या मदतीतून सहकार्य करण्याचे अविरत काम सुरू ठेवले. घरगुती साहित्याबरोबरच साहित्याचे वाटप,विविध सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या आणि लॉकडाऊन काळात विशेष उल्लेखनीय काम करणाऱ्या लोकांचे सन्मान करून त्यांच्या कार्याची दखल घेण्याचे काम त्यांच्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून त्यांनी केले.
कोरोना बाबत जनजागृतीसाठी आदर्श माता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून त्यांनी पुढाकार घेऊन कराड तालुका, सातारा जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात विविध उपक्रम राबवण्याचे महान कार्य केले आहे.
विश्वास मोहिते यांनी पत्रकाराची स्वतंत्र संघटना असावी म्हणून देशपातळीवरती अखिल भारतीय ग्रामीण वार्ताहर विकास परिषद या पत्रकारांचे संघटनेची स्थापना केली आहे, या पत्रकार संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांवरती होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात निर्भीडपणे आवाज उठवला आहे. लॉकडाऊन काळात पत्रकारांना विशेष विशेष पॅकेज जाहीर करा म्हणून पहिले निवेदन महाराष्ट्र राज्यातून विश्वास मोहिते यांनी तत्कालीन मुख्यमंत्री यांना दिले होते. सातत्याने 20 ते 22 वर्षे सामाजिक कार्यामध्ये ते सक्रिय आहेत. त्यांनी संस्थेच्या आणि संघटनेच्या माध्यमातून दलित, पदलित, वंचित निराधार अपंग या लोकांना मदतीचा सदैव आज पुढे केला आहे. ना जात ना धर्म आम्ही मानतो फक्त माणसाचे कर्म या विचारावरती सातत्याने त्यांनी मानवता धर्म पाळण्याचे आणि मानवता धर्म ही विचारधारा रुजवण्याचे काम सदैव केले आहे.
पाडळी (केसे) येथील गावातील विविध प्रश्नांवर निर्भीडपणे आणि सातत्याने आवाज उठवल्याने ग्रामस्थांनी त्यांना महात्मा गांधी तंटामुक्ती गाव मोहीम समितीचे अध्यक्षपदी त्यांची बिनविरोध निवड केली होती. दिलेल्या पदाचा योग्य वापर करून काही प्रकरणे स्थानिक पातळीवर मिटवण्याचे कामही काम ही त्यांनी केले आहे.
विश्वास मोहिते यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन सत्ता ही समाज परिवर्तनाची गुरुकिल्ली आहे आणि सत्ता हातात असेल तर समाजाचे हित मोठ्या गतीने करता येते या विचारधारेनुसार या विभागातील नागरिकांनी,विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी यांनी आगामी पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद निवडणूक लढवावी अशीही आम्ही कार्यकर्त्यांनी अपेक्षा आमची त्यांच्याजवळ व्यक्त केली आहे. विश्वास मोहिते यांचे कार्य भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार प्रणाली वरती असल्याने त्यांनी नवीन पक्षाची स्थापना करावी,अशी आम्ही कार्यकर्त्यांनी त्यांच्याजवळ आमची इच्छा व्यक्त केली आहे. अशा सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या निर्भीड निपक्ष आणि धडाडीच्या कार्यकर्त्याला आमच्या सामाजिक कार्यकर्त्याकडून लाख लाख शुभेच्छा

*बाबासाहेब कांबळे, शिराळा.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here