
सातारा/ खटाव (प्रतिनिधी) नितीन राजे
पुसेगाव तालुका खटाव जिल्हा सातारा येथील श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्ट आणि प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या सयुक्त विद्यमाने श्री सेवागिरी मंदिरात आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिरास प्रतिसाद मिळाला. शिबिरात येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ओमकार हेंद्रे, डॉ. नेहा मांडवकर व त्यांच्या टीमने रुग्णांची तपासणी व निदान करून मोफत औषधोपचार केले. शिबिर यशस्वीतेसाठी देवस्थानचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज, ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब ऊर्फ संतोष जाधव, विश्वस्त गौरव जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, डॉ. सुरेश जाधव, रणधीर जाधव यांनी परिश्रम घेतले.
