Home महाराष्ट्र सेवा निवृत्त प्राचार्य मधुकर व मुख्याध्यापिका प्रमिला फुले यांनी लग्नाच्या सुवर्ण महोसत्वी...

सेवा निवृत्त प्राचार्य मधुकर व मुख्याध्यापिका प्रमिला फुले यांनी लग्नाच्या सुवर्ण महोसत्वी निमित्त सत्यशोधक विवाह करून दिली समाजाला दिशा – सत्यशोधक ढोक फुले एज्युकेशन तर्फे फुले दांपत्यांनी सुवर्ण महोसत्वी लग्नानिमित्त केला सत्यशोधक विवाह !!!

50

सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा.9075686100

म्हसवड : फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अंड सोशल फौंडेशन ,पुणे च्या बहुद्देशीय सत्यशोधक केंद्रातर्फे सत्यशोधक समाज स्थापना दिन शतकोत्तर सुवर्ण महोसत्वी वर्षानिमित्त सोमवार दि.२९ मे २०२३ रोजी सायंकाळी ७ वा. कम्युनिटी हॉल (क्लब हौऊस) मगरपट्टा सिटी ,पुणे येथे शिवाजी विद्यापीठ ,कोल्हापूरच्या नाईट ऑफ आर्ट कॉमर्स कॉलेज चे माजी प्राचार्य सत्यशोधक प्रा.मधुकर मारुतीराव फुले ,MA.LLB (वय-७७) आणि सासवड कन्या हायस्कूलच्या माजी मुख्याध्यापिका सत्यशोधिका प्रा. प्रमिला मधुकर फुले ,BA.BED, (वय-७३) या उच्चशिक्षित तसेच शिक्षण क्षेत्रातील उच्च पद भूषविणारे जेष्ठ वधू वरांचा सुवर्ण महोसत्वी लग्न वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा महात्मा फुले यांना अभिप्रेत असलेल्या पध्द्तीने सत्यशोधक विवाह लावून हा संस्थेतर्फे मोफत ४३ वा .सत्यशोधक विवाह सोहळा विधीकर्ते सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी समाजाला दिशा देत पार पाडला.

या प्रसंगी प्रा. मधुकर फुले यांना नोकरी करीत 5मुली दत्तक घेऊन शिक्षण व लग्न लावून देणे, कोल्हापूर मद्ये पती पत्नीने प्रथम निवासी अंध शाळा 1987 ला सुरू करून शासन अनुदानित केली,सुरवातीला वर्षभर अंध मुलांना घरून जेवण पुरविले या व अनेक प्रकारे समाजसेवा केली म्हणून जेष्ठ समाजसेवक अनिल पैठणकर यांचे शुभहस्ते महात्मा फुले पगडी परिधान करून दोघांचे अंगावर महात्मा फुले उपरणे पांघरून सत्यशोधक आशा व रघुनाथ ढोक यांनी सत्यशोधक विवाह प्रमाणपत्र आणि थोरसमाजसुधारक महात्मा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची फोटोफ्रेम संस्थेचे वतीने भेट दिली. तर त्यांची मुले इजि.सत्येन व प्रा.सुवर्णा फुले आणि डॉ.निलेश व डॉ.स्मिता फुले यांनी हा सोहळा आयोजित केला म्हणून त्यांचा राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे सन्मानपत्र देऊन गौरव केला .यावेळी अक्षता म्हणून फुले वापरले तर महात्मा फुले रचित मंगळाषटके चे गायन ढोक यांनीच केले.

यावेळी सत्यशोधक रघुनाथ ढोक म्हणाले की संस्थेतर्फे हा पहिलाच सुवर्ण महोसत्वी निमित्त सत्यशोधक विवाह लावण्यात आला.आजच्या विज्ञान युगात असे विवाह करणे गरजेचे असून अंधश्रध्दा ,कर्मकांड ,पंचांग आणि मुहुर्थ याला तिलांजली देणे काळाची गरज आहे. पुढे ढोक म्हणाले की सर्व समाजाला या फुले दाम्पत्यांनी या वयात देखील उच्चशिक्षित ,उच्च पद भूषविले असताना देखील सत्यशोधक पध्द्तीने विवाह करून समाजाला दिशा देत हीच विवाहाची पद्धत श्रेष्ठ आहे हे सांगण्याचा प्रयत्न केलाय ही खूप मोठी गोष्ट आहे. यांचा आदर्श नवीन पिढी नक्की घेतील .या विवाहाच्या निमित्ताने आज प्रमिला मधुकर प्रतिष्ठान फलकाचे अधिकृत उद्घाटन करून या प्रतिष्ठान मार्फत विधिकर्ते ढोक यांनी महाराष्ट्र व परराज्यात सत्यशोधक पद्धतीने कार्य केले म्हणून पती पत्नीचा सन्मानपत्र देऊन प्राचार्य फुले यांनी सन्मान केला तर १५० मान्यवरांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले ग्रंथ भेट दिले. या कार्यक्रमाचे सुरुवातीला फुले दाम्पत्यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांनी पुढील वैवाहिक जीवनाची शपथ देखील घेतली तर आभार सत्येन फुले यांनी मानले.आणि मोलाची मदत आकाश –क्षितीज ढोक यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here