Home महाराष्ट्र संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे 11 जून रोजी पंढरपूर कडे प्रस्थान

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे 11 जून रोजी पंढरपूर कडे प्रस्थान

31

सातारा/खटाव (प्रतिनिधी) नितीन राजे. 9822800812

 

महाराष्ट्राची अध्यात्मिक परंपरा वारसा जोपासणारी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचे पालखी सोहळ्याचे प्रस्थान आळंदीहून दिनांक अकरा रोजी होत आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आषाढी वारी सोहळा 11 जूनला आळंदीतून पालखी प्रस्थान ठेवणार असून 29 जूनला पंढरीत
पोहचणार आहे माऊलींची पालखी आळंदी मंदिराच्या दर्शन मंडप मधून प्रस्थान ठेवणार देशभरातून हजारो वारकरी माऊलींच्या या पायी सोहळ्यात सहभागी होतात. यावर्षी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या वारीचे वेळापत्रक असे राहील .संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखीचे आषाढी वारीसाठी रविवार दिनांक 11 जून रोजी प्रस्थान होणार हा पालखी सोहळा पुणे सासवड आणि लोणंद दोन दिवस तर फलटणला एक दिवस मुक्कामी असणारे फलटण येथे दोन ऐवजी एक मुक्काम असणारे रविवार 11 जूनला सायंकाळी चार वाजता श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आळंदी येथील प्रस्थान करेल रात्री आळंदीतच आजोळ घरी गांधीवाडा दर्शन बारी मंडपात मुक्कामी राहील सोमवारी 12 तारखेला सकाळी आळंदीतून मार्गस्थ होईल आणि सायंकाळी पुण्यात मुक्कामी राहील मंगळवारी 13 तारखेला देखील पालखी पुण्यातच मुक्कामी राहील बुधवारी 14 आणि गुरुवारी 15 या तारखेला पालखी सोहळा सासवड येथे दोन दिवस मुक्कामी राहील त्यानंतर शुक्रवारी 16 तारखेला जेजुरी शनिवारी 17 वाल्हे रविवारी 18 नीरा नदी स्नान करून सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करेल व 19 या दोन दिवशी लोणंद येथे मुक्कामी राहील. मंगळवारी वीस तारखेला चांदोबाचं लिंबू येथे पहिला उभा रिंगण पार पडेल बुधवारी 21 फलटण गुरुवारी 22 बरड शुक्रवारी 23 नातेपुते असा प्रवास करून शनिवारी 24 तारखेला माळशिरस येथे पहिलं गोल रिंगण पार पडेल रविवारी 25 वेळापूर खडूस फाटा येथे दुसरे गोल रिंगण आणि सोमवारी 26 तारखेला येथे तिसरा गोल रिंगण पार पडेल मंगळवारी 27 तारखेला बाजीराव विहीर येथे दुसर उभ रिंगण आणि चौथ गोल रिंगण, बुधवारी 28 तारखेला पादुका जवळ आरती आणि तिसरा उभा रिंगण पार पडेल आणि श्री क्षेत्र पंढरपूर येथे पलखी सोहळा मुक्कामी 29 तारखेला आषाढी एकादशी. तीन तारखेपर्यंत पंढरपूर येथे पालखी गोपाल काल्याच्या कार्यक्रमानंतर पालखी पुन्हा आळंदीकडे परतीचा प्रवास सुरू होणार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here